शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

हिमाचलसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी! फेरबदल केल्याने इच्छुकांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:04 PM

रमेश धवला हे देहरामधून तर रविंदर सिंग रवी हे माजी मंत्री ज्वालामुखीतून निवडणूक लढविणार आहेत.

- मोनिका गुप्ता

चंदीगड : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने सर्व ६८ मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत कुल्लूमधून महेश्वर सिंग, बारसरमधून माया शर्मा, हरोलीतून प्रा. रामकुमार आणि रामपूरमधून कौल नेगी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

रमेश धवला हे देहरामधून तर रविंदर सिंग रवी हे माजी मंत्री ज्वालामुखीतून निवडणूक लढविणार आहेत. यावेळी धवला आणि रविंदर रवी यांच्या मतदारसंघात बदल करण्यात आला आहे. ज्वालामुखी हा रमेश धवला यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. रविंदर रवी यांच्यासाठीही देहरा मतदारसंघ सुरक्षित होता.

१९९८ मध्ये अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत पोहोचलेल्या धवला यांनी नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. ते माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांच्या जवळचे आहेत. गेल्या पाच वर्षांत धवला हे त्यांच्याच सरकारच्या कार्यशैलीविरुद्ध आक्रमक दिसले. संघटनेचे सरचिटणीस पवन राणा यांच्यासोबत त्यांचा संघर्ष दिसून आला. माजी मंत्री रविंदर सिंग रवी यांना तिकीट देऊन रमेश धवला यांना ज्वालामुखी येथे पाठवून भाजपाने नवीन प्रयोग केला आहे. मात्र, अपक्ष होशियार सिंग यांना तिकीट न दिल्याने ते भाजपासमोर आव्हान ठरणार आहेत.

रविंदर सिंग रवीदेहरा हा रविंदर सिंग रवी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. धुमल सरकारमध्ये ते मंत्री आहेत. २०१२ मध्ये थुरल मतदारसंघ रद्द केल्यानंतर रविंदर सिंग रवी यांनी देहरामधून निवडणूक लढविली. त्यानंतर २०१७ पर्यंत ते देहरामधून निवडणूक लढवित राहिले. गेल्या निवडणुकीत अपक्ष होशियार सिंग यांनी त्यांचा पराभव केला. भाजपाने नुकतेच होशियार सिंग यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर रविंदर सिंग रवी हे नाराज झाले. आता त्यांना ज्वालामुखीतून तिकीट देण्यात आले आहे. ज्वालामुखीमध्ये रमेश धवला यांच्या विरोधात असलेल्या भाजपाच्या प्रभावशाली गटाला शांत करणे हाही त्यामागचा उद्देश आहे.

कौल नेगीप्रतिभा वीरभद्र सिंग यांचे रामपूर येथे घर आहे. हा राखीव मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भाजपा निवडणूक हरत आलेला आहे. अभाविपच्या माध्यमातून भाजपामध्ये आलेले तरुण कौल नेगी यांना यंदा संधी देण्यात आली आहे.

बरसरमधून माया शर्मामाजी आमदार बलदेव शर्मा यांच्या पत्नी माया शर्मा या बारसरमधून निवडणूक लढविणार आहेत. २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार इंद्रदत्त लखनपाल यांच्याकडून बलदेव शर्मा यांचा पराभव झाला होता. यावेळी माया शर्मा यांना तिकीट देऊन महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

हरोलीतून प्रो. रामकुमारहरोलीतून काँग्रसचे मुकेश अग्निहोत्री यांच्याविरोधात भाजपाने प्रो. रामकुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रो. रामकुमार यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये अग्निहोत्री यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली आणि दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला.

कुल्लूमधून महेश्वर सिंह२०१७ मध्ये महेश्वर सिंह हे काँग्रेसचे उमेदवार सुंदर सिंह ठाकूर यांच्याकडून निवडणूक हरले. महेश्वर सिंह हे २०१२ मध्ये त्यांचा नवीन पक्ष हिलोपामधून आमदार झाले. महेश्वर सिंह यांचा मुलगा हितेश्वर सिंह हेदेखील बंजारमधून उमेदवारी मागत होते.

टॅग्स :BJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेश