शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

दुसरा चमत्कार पोपनी स्वीकारला, मदर तेरेसांना संतपद मिळणार

By admin | Published: December 18, 2015 2:53 PM

मदर तेरेसांनी मृत्यू झाल्यानंतरही रुग्णाला बरे करण्याचा दुसरा चमत्कार केल्याचे पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून, मदर तेरेसांना पुढील वर्षी संतपद देण्यात येणार असल्याची माहिती

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १८ - मदर तेरेसांनी मृत्यू झाल्यानंतरही रुग्णाला बरे करण्याचा  दुसरा चमत्कार केल्याचे पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून, मदर तेरेसांना पुढील वर्षी संतपद देण्यात येणार असल्याची माहिती कोलकात्याच्या आर्चबिशपनी दिली आहे. कोलकात्यातल्या रस्त्यावरच्या गरीबांना तसेच रुग्णांना आधार देणा-या मदर तेरेसांना यापूर्वी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
ख्रिश्चन धर्मामध्ये चमत्कार सिद्ध करणा-यांना चर्च संतपद देते. आणि मृत्यूनंतरही चमत्कार घडू शकतो अशी श्रद्धा आहे. ब्रेन ट्युमरमुळे अंथरुणाला खिळलेल्या एका ब्राझिलच्या रुग्णाला मदर तेरेसांनी २००८ मध्ये म्हणजे मृत्यूनंतरही बरे केल्याचा चमत्कार केल्याचा दावा पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारल्याचे आर्चबिशप थॉमस डिसोझांनी सांगितले. मदर तेरेसांचा दुसरा चमत्कार स्वीकारण्यात आल्याचे मला रोममधून कळवण्यात आल्याचे डिसोझा यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले आहे. 
मूळच्या अल्बानियातल्या तेरेसांनी भारतात आपले आयुष्य व्यतित केले. त्या १९९७ साली वयाच्या ८७व्या वर्षी भारतातच मरण पावल्या. 
मदर तेरेसांबरोबर काम केलेल्या त्यांच्या चॅरीटेबल ट्रस्टच्या प्रवक्त्या सुनीता कुमार यांनी या वृत्ताबद्दल संतोष व्यक्त केला आहे. माझ्या जिवंतपणी मदर तेरेसांना संतपद मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया सुनीता कुमार यांनी व्यक्त केली आहे.