नवी दिल्ली - Phase 2 Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा सुरू केली आहे. अद्यापही आघाडी आणि युतीमध्ये काही जागांवरून चर्चा सुरू आहेत. मात्र निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली आहे. १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जारी केले आहे.
दुसऱ्या टप्प्यात कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान?
आसाम - ०५बिहार - ०५छत्तीसगड - ०३जम्मू काश्मीर - ०१कर्नाटक - १४केरळ - २०मध्य प्रदेश - ०७महाराष्ट्र - ०८राजस्थान - १३त्रिपुरा - ०१उत्तर प्रदेश - ०८पश्चिम बंगाल - ०३मणिपूर - ०१
दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ४ एप्रिल २०२४ अखेरची तारीख आहे. तर ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील या जागांसाठी होणार मतदान?
अकोलाअमरावतीबुलढाणाहिंगोलीनांदेडपरभणीवर्धायवतमाळ-वाशिम