ऑनलाइन लोकमत
गुवहाटी, दि. ११ - आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण विधानसभेच्या ९२ जागांसाठी मतदान होत आहे. आसाममध्ये मतदानाचा दुसरा आणि अंतिम टप्पा असून, एकूण ६१ उमेदवार रिंगणात आहेत तर पश्चिम बंगालमध्ये ३१ जागांसाठी मतदान होत आहे.
Requesting all those voting in Assam & West Bengal today to cast their vote in large numbers.— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2016
आसाममध्ये ५२५ उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत तर, पश्चिम बंगालमध्ये ३१ जागांसाठी १६३ उमेदवार रिंगणात आहेत. आसाममध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस सत्तेवर आहे. या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय ताकद वाढवणे भाजपचे लक्ष्य असल्याने भाजपने इथे जोरदार प्रचार केला आहे.
राष्ट्रीय राजकारणावर या निवडणूक निकालांचा प्रभाव पडणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकूण एक कोटी ७० लाख नागरीकांकडे मतदानाचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाम आणि पश्चिम बंगालच्या जनतेला मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Voting for second part of the first phase underway in West Bengal: People queue up to cast their vote pic.twitter.com/BJtGaL3NtS— ANI (@ANI_news) April 11, 2016