शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

Coronavirus Cases: कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा भयंकर; तरुण, मुले, गर्भवतींना वेगाने संक्रमण, तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 3:20 PM

Coronavirus second wave: कोरोनाची दुसरी लाट देशात आधीपेक्षा खूप जास्त वेगाने पसरत आहे. हे दररोज प्रसिद्ध केले जाणारे आकडेच सांगत आहेत.

कोरोना व्हायरसची (Corona Virus) ही दुसरी लाट आधीपेक्षाही जास्त खतरनाक आहे. हे दररोज प्रसिद्ध केले जाणारे आकडेच सांगत आहेत. मात्र, डॉक्टरांनी यामागची कारणेही सांगितली आहेत. दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, या लाटेमध्ये कोरोनामुळे आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत तरुण, मुले आणि गर्भवती महिलांची संख्या अधिक आहे. (Corona virus second wave is danger than previous, infection youth, children and pregnant women.)

कोरोनाची दुसरी लाट देशात आधीपेक्षा खूप जास्त वेगाने पसरत आहे. गेल्या आठवड्यात 20 रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. आता ही संख्या 170 झाली आहे. दिल्लीमध्ये आता बेड्सची मागणी वाढू लागली आहे. 

डॉ. सुरेश यांनी सांगितले की, आधी जे लोक कोरोना संक्रमित होत होते ते वयोवृद्ध होते. मात्र, आता तरुण, मुले, गर्भवती महिला देखील नवीन कोरोनाच्या लाटेत सापडू लागले आहेत. कोरोनाच्या या लाटेला थोपविण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये उपाययोजना केल्या आहेत. मात्र, हॉस्पिटलमधील ओपीडी बंद करण्याबाबत अद्याप काही ठरलेले नाही.

Coronavirus Symptoms : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेळीच ओळखा ही नवी ३ लक्षणं; नाहीतर होऊ शकतं गंभीर संक्रमण दिल्लीच्या एम्समध्ये शिकाऊ डॉक्टरांना घरी पाठविण्यात आले असून सामान्य रुग्णांसाठी ओपीडी बंद करण्यात आली आहे. मुंबईत सापडणाऱ्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. डॉ. के.के. अग्रवाल यांच्यानुसार महिला आणि मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी दिसतात, मात्र त्यांना सावध राहण्याची गरज आहे. जर कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण दिसले तर त्याचा अर्थ कोरोना विषाणू त्याच्यावर हल्ला करत आहे. जर तुम्ही कोणा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला असाल कर आयसोलेट करणे हा एक पर्याय आहे.

दिल्ली, महाराष्ट्र सर्वाधिक संक्रमित...दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 5100 नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा नोव्हेंबर 2020 नंतरचा मोठा आकडा आहे. यामुळे दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर पंजाबमध्येही नाईट कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. काल आलेल्या आकडेवारीत 56 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या