शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

भारतीय सैन्याकडून लश्करच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; जम्मूत पुन्हा दिसले संशयित ड्रोन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 10:24 AM

Security Forces Killed Terrorists: चकमकीत सीआरपीएफचे दोन जवानही जखमी झालेत.

ठळक मुद्दे26 जूनच्या रात्री जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता.

श्रीनगर: श्रीनगरमधील दानमार परिसरात शुक्रवारी भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दोघांचे मृतदेह सैन्याने ताब्यात घेतले आहेत. मृतांमध्ये इरफन आणि बिलाल अहमद असून, हे दोघे पाकिस्तानातील लश्कर-ए-तैएबासाठी काम करायचे. सैन्याने त्या दोघांकडून AK 47 रायफल आणि 4 हँड ग्रेनेड जप्त केले आहेत.

चकमकीत सीआरपीएफचे दोन जवानही जखमी झालेत. पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सफाकदल-सौरा रोड जवळ असलेल्या दानमार परिसरात दहशतवादी लपले असल्याची गुप्त सूचना मिळाली होती. यानंतर सैन्याने नाकाबंदी करुन सर्च ऑपरेशन सूरू केले. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सैन्यावर फायरिंग सुरू केली. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याला फायरिंग करावी लागली. यात दोन दहशतवादी मारले गेले.

बुधवारी तीन दहशतवादी मारलेयापूर्वी बुधवारी पुलवामामध्ये भारतीय सैन्याने चकमकीत तीन दहशतवाद्यांना मारले. यात पाकिस्तानी लश्कर कमांडर एजाज उर्फ अबु हुरैरादेखील होता. इतर दोघे स्थानिक होते. IGP विजय कुमार यांनी सांगितले की, हुरैरा श्रीनगर आणि पुलवामामध्ये सक्रीय होता. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये मागील 15 दिवसात 18 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

जम्मूमध्ये पुन्हा दिसले संशयित ड्रोनबुधवारी रात्री जम्मूतील एअर फोर्स स्टेशनजवळ एक संशयित ड्रोन दिसून आला.  जम्मू-काश्मीरमध्ये संशयित फ्लाइंट ऑब्जेक्ट दिसण्याची ही मागील दोन दिवसातील दुसरी घटना आहे. यापूर्वी, मंगळवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर एक उडणारी वस्तु दिसली होती.

जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता26 जूनच्या रात्री जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यात दोन जवान किरकोळ जखमी झाले होते. 5 मिनीटांच्या अंतराने दोन ब्लास्ट झाले. यावळी ड्रोनद्वारे एअरफोर्स स्टेशनवर दोन IED टाकण्यात आले. जम्मू-काश्मीरचे DGP दिलबाग सिंह यांनी त्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद