श्रीनगर - गेल्या काही दशकांपासून काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या वर्षी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात आतापर्यंत झालेल्या चकमकींमध्ये लष्कराने तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांनी आज ही माहिती दिली. लष्कराने दहशतवाद्यांविरोधात उघडलेल्या व्यापक मोहिमेची माहिती देताना 15 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट म्हणाले की,''विविध सुरक्षा दलांमधील समन्वय आणि लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी दिलेल्या मोकळीकीमुळे या वर्षभरात 311 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.'' काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या तुलनेत यावर्षी अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 12:20 PM
गेल्या काही दशकांपासून काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
ठळक मुद्देसरत्या वर्षात दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले या वर्षी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात आतापर्यंत झालेल्या चकमकींमध्ये लष्कराने तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले सुरक्षा दलांमधील समन्वय आणि लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी दिलेल्या मोकळीकीमुळे या वर्षभरात 311 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश