प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. एका सिक्योरिटी गार्डच्या मुलाने घवघवीत यश मिळवलं असून तो IRS ऑफिसर झाला आहे. कुलदीप द्विवेदी असं या तरुणाचं नाव आहे. कुलदीपचा जन्म उत्तर प्रदेशातील नोगोहा जिल्ह्यातील शेखपूर गावात झाला. वडील सिक्योरिटी गार्ड होते आणि आई गृहिणी होती. वडिलांनी संदीप, प्रदीप आणि स्वाती आणि कुलदीप या चार मुलांना मोठ्या कष्टाने वाढवलं.
कुलदीपचे वडील सूर्यकांत यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आणि आई मंजू यांनी इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले, पण गरिबीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग शिक्षण आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी आपल्या मुलांना अभ्यासापासून कधीच रोखले नाही. फी भरण्यासाठी अनेकदा कर्ज घ्यावे लागले, पण त्यांनी हे सर्व केले. 2015 मध्ये त्यांना याचं फळ मिळालं जेव्हा त्याचा मुलगा कुलदीपने तिसऱ्या प्रयत्नानंतर देशातील सर्वात प्रतिष्ठित UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
गेल्या अनेक दिवसांपासून कुलदीपचे सहा जणांचे कुटुंब शेखपूर येथे एका खोलीच्या घरात राहत होते. लखनौच्या बछरावन येथील गांधी विद्यालयात बदली होण्यापूर्वी त्यांनी सरस्वती शिशु मंदिरातील आपल्या भावंडांसोबत हिंदी माध्यमाच्या शाळेत 7वीपर्यंत शिक्षण घेतले. कुलदीपने हिंदी आणि भूगोल विषयात बीए आणि एमए पूर्ण करून अलाहाबाद विद्यापीठासाठी पात्रता मिळवली. बहिणीने सांगितलं की, कुलदीप, इयत्ता सातवीत असताना त्याला नागरी सेवेत जॉईन व्हायचे होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बालपणीचे स्वप्न सोडले नाही.
परीक्षेची तयारी करण्यासाठी तो लवकरच मुखर्जी नगरमधील 10×10 चौरस फूट भाड्याच्या खोलीत गेला. त्याचे मित्र ज्या कोचिंग क्लासला जायचे ते त्याला परवडत नव्हते. त्याच्या वडिलांना महिन्याला 6,000 रुपये मिळतात आणि घराचे भाडे देण्यासाठी 2,500 रुपयांपेक्षा जास्त पाठवू शकत नव्हते. त्याच्या आईने त्याला नोकरीसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. 2013 मध्ये त्याची सीमा सुरक्षा दलात असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली. पण त्याच्या मनात फक्त UPSC पास होणे हेच ध्येय होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"