शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सोमनाथ मंदिरावरील दहशतवादी हल्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला

By admin | Published: March 15, 2016 6:26 PM

सोमनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या हेतूने भारतात घुसखोरी केलेल्या दहशतवादयांचा सुरक्षा यंत्रणांनी खात्मा केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - सोमनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या हेतूने भारतात घुसखोरी केलेल्या दहशतवादयांचा सुरक्षा यंत्रणांनी खात्मा केला आहे. गुजरातमार्गे भारतात घुसखोऱी केलेल्या 10 दहशतवाद्यांपैकी 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. महाशिवरात्रीला दहशतवादी हल्ले करण्याच्या हेतून हे दहशतवादी भारतात घुसले होते
 
सीएनएन-आयबीएनने दिलेल्या माहितीनुसार घुसखोरी केलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. दहापैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून इतर सात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
 
गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने दहा दहशतवादी घुसल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर खान जानजुआ यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला होता. महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान घातपाती कारवाया करण्याच्या इराद्याने हे दहशतवादी घुसल्याचा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी वर्तवला आहे.