Sedition Cases: भाजप राहुल गांधींवर दाखल करणार देशद्रोहाचा खटला, 'हे' आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:34 AM2022-02-14T10:34:37+5:302022-02-14T10:39:21+5:30
Sedition Cases: राहुल गांधींनी भारताचे 'गुजरात ते बंगाल' असे वर्णन केले आहे.
नवी दिल्ली: भारताचे 'गुजरात ते बंगाल' असे वर्णन केल्याप्रकरणी राहुल गांधी अडचणीत आले आहेत. राहुल यांच्या एका ट्विटमुळे असाम भाजप राहुल यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. ANI न्यूज एजन्सीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्या ट्विटसाठी भाजपकडून 14 फेब्रुवारीला आसाममध्ये किमान एक हजार देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला
रविवारी असामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला होता. हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाषा 1947 पूर्वी जीनांच्या भाषेसारखीच आहे, असे विधान केले होते. आसामचे मुख्यमंत्री इथेच न थांबता राहुल गांधींमध्ये जिनांचं भूत शिरलं असल्याचं म्हटलं होतं.
BJP Assam to file sedition cases against Rahul Gandhi over his 'India exists from Gujarat to Bengal' remark: Sources
— ANI Digital (@ani_digital) February 13, 2022
Read @ANI Story | https://t.co/vsEr6TVUb2#Assam#BJPpic.twitter.com/7WFty7Ss49
'गुजरात ते बंगाल' ट्विट करत राहुल गांधींना घेरले
राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनीही काँग्रेस नेत्यासाठी भारत पश्चिम बंगालमध्ये संपतो, असे म्हटले होते. माझा अरुणाचल प्रदेश भारताचा ईशान्य भाग आहे, हे त्यांना दिसत नाही, असे ते म्हणाले होते. आता राहुल गांधींच्या ट्विटवर भाजप त्यांच्यावर आसाममध्ये देशद्रोहाचा खटला दाखल करणार आहे.