शर्जीलवर देशद्रोहाचा खटला चालणार, न्यायालयाचा आदेश; CAA संदर्भात केले होते चिथावणीखोर वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 03:51 PM2022-01-24T15:51:36+5:302022-01-24T15:52:03+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅडिशनल सेशन जज अमिताभ रावत यांनी हानिर्णय दिला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, शर्जील इमामलवर आयपीसीच्या सेक्शन 124A (देशद्रोह), 153A, 153B आणि 505 आणि UAPA च्या सेक्शन 13 अंतर्गत गुन्हा दाखल होईल. 

Sedition charge on Sharjeel imam, delhi court orders, The provocative statement was made in reference to the CAA | शर्जीलवर देशद्रोहाचा खटला चालणार, न्यायालयाचा आदेश; CAA संदर्भात केले होते चिथावणीखोर वक्तव्य

शर्जीलवर देशद्रोहाचा खटला चालणार, न्यायालयाचा आदेश; CAA संदर्भात केले होते चिथावणीखोर वक्तव्य

googlenewsNext

न्यायालयाने दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या शर्जील इमामवर (Sharjeel Imam) देशद्रोह आणि यूएपीएसह इतरही अनेक कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. सीएए विरोधी निदर्शनादरम्यान शर्जीलने केलेल्या भाषणांमुळे ही कलमे लावली जातील. शर्जीलने अलीगढ मुस्लीम विद्यापीठ (यूपी) आणि दिल्लीतील जामिया परिसरात ही भाषणे दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅडिशनल सेशन जज अमिताभ रावत यांनी हानिर्णय दिला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, शरजील इमामलवर आयपीसीच्या सेक्शन 124A (देशद्रोह), 153A, 153B आणि 505 आणि UAPA च्या सेक्शन 13 अंतर्गत गुन्हा दाखल होईल. न्यायालयाने म्हटले आहे की, 2019च्या डिसेंबर महिन्यात देण्यात आलेल्या भाषणांसाठी शर्जील इमामला ट्रायलचा सामना करावा लागणार आहे. शर्जीलची ती भाषणे न्यायालयाने भडकाऊ अथवा चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे.

शर्जील इमाम आसामला देशापासून वेगळे करण्यासंदर्भातील वक्तव्यांमुळे चर्चेत आला होता. यानंतर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शर्जीलविरोधात अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटी प्रिव्हेंशन अ‍ॅक्टनुसार (यूएपीए)  गुन्हा दाखल केला होता.

शर्जीलने अलिगढ मुस्लीम विद्यापीठात 16 जानेवारी 2020 रोजी दिलेल्या भाषणानंतर, त्याच्यावर पाच राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दिल्लीसह आसाम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरचा समावेश होता. शर्जीलला बिहारमधून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी शर्जीलविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानी आपल्या भाषणातून केंद्र सरकारबद्दल द्वेष आणि तिरस्कार निर्माण केली होती, यामुळे लोक भडकले आणि डिसेंबर 2019 मध्ये जामियामध्ये हिंसाचार झाला.

Web Title: Sedition charge on Sharjeel imam, delhi court orders, The provocative statement was made in reference to the CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.