जप्त केलेले कपाशी बियाणे बोगस पत्रपरिषद : रॅपर, सूचनांमधील अनागोंदी केली उखड
By admin | Published: June 08, 2016 11:02 PM
जळगाव : जि.प.च्या कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांचे पथक आणि स्थानिग गुन्हे शाखा आदींनी मंगळवारी जिल्यात चाळीसगाव, जामनेर आणि भुसावळात जप्त केलेले सुधारित देशी कपाशीचे बियाणे बोगस असल्याचा निर्वाळा बुधवारी जि.प.च्या कृषि विभागाने पत्रपरिषदेतून केला.
जळगाव : जि.प.च्या कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांचे पथक आणि स्थानिग गुन्हे शाखा आदींनी मंगळवारी जिल्यात चाळीसगाव, जामनेर आणि भुसावळात जप्त केलेले सुधारित देशी कपाशीचे बियाणे बोगस असल्याचा निर्वाळा बुधवारी जि.प.च्या कृषि विभागाने पत्रपरिषदेतून केला. कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, जिल्हा कृषि अधिकारी (प्रशासन) सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी प्रदीप ठाकरे, कृषि अधिकारी, एम.एस.भालेराव, निर्मल सिड्सचे व्यवस्थापक आर.आर.बागुल आदींनी बोगस बियाण्यासंबंधी विविध दाखले दिले. चाळीसगाव व जामनेर येथे कपाशीच्या अंबिका-१२ या बियाण्याच्या नावाखाली विक्रीसाठी आणलेली ३९९ पाकिटे बोगस आहेत. तसेच भुसावळात पकडलेले स्वदेशी-५ कपाशी बियाणेही बोगस असल्याचे कृषि विकास अधिकारी चौधरी म्हणाले. रॅपरवर चुकीच्या नोंदीअंबिका १२ च्या बोगस बियाण्याच्या पाकिटावर निर्मल सिड्चे नाव निरामल सिड्स असे मुद्रित केले आहे. तसेच बियाण्याची वैधता तारीख किंवा मर्यादा नमूद केली नाही. तर स्वदेशी-५ चे बोगस बियाणे भाजलेले असल्याची भीती आहे. हे बियाणे पेरले किंवा त्याची लागवड केली तर ते उगवणारच नाही. त्यामुळे पीक उगवणार नाही तर तक्रार कुणाकडे करणार, असा प्रश्न शेतकर्यांसमोर असेल. ज्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत अंबिका १२ व स्वदेशी-५ चे बियाणे घेतले आहे. ते संबंधितांना परत करावे. ज्यांच्याकडून घेतले त्याची माहिती कृषि विभागाला द्यावी, असे आवाहन अधिकार्यांनी केले. स्वदेशी- ५ आज दाखल होणार, पण दरवाढराज्यात किंवा जिल्ात आतापर्यंत स्वदेशी-५ चे बियाणे आलेले नव्हते. त्याचा पुरवठा ९ रोजी होणार असून, पाच हजार पाकिटे मिळतील. अंकूर सिड्सतर्फे त्याचा पुरवठा होणार आहे. अधिकृत विक्रेत्यांकडून त्याची खरेदी करावी. परंतु त्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. या बियाण्याचे पाकीट शासनाने किमती वाढविल्याने आता ५०० ऐवजी ६९० रुपयात मिळणार असल्याचे कृषि विभागाने सांगितले.