नवी दिल्ली : भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी देशी उद्याेजकांना आयातीसाठी स्वदेशी पर्याय शाेधण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय परिवहन आणि लघुउद्याेगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘फिक्की’च्या वार्षिक संमेलनात ते बाेलत हाेते. भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी उत्पादन क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा सध्याच्या २२-२६ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याने सांगतानाच कृषी क्षेत्राचा वाटाही २५ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. आपण अनेक गाेष्टींची आयात करताे. त्यांना स्वदेशी पर्याय शाेधण्याची गरज आहे. दर्जा आणि किमतीसाेबत तडजाेड न करताही पर्याय मिळू शकताे. हेच खरे आत्मनिर्भर भारत मिशन आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढविणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. ‘आत्मनिर्भर’ हाेण्यासाठी बाजारात राेख उपलब्धतेचीही गरज आहे. गुंतवणूक आणि विकासदर वाढविणे अवघड असून, बेराेजगारीही कमी हाेणार नसल्याचे गडकरी म्हणाले.
‘आत्मनिर्भर’साठी स्वदेशी पर्याय शाेधावा- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 2:00 AM