सचिन मीणासोबत वाद आणि मारहाणीच्या बातमीवर सीमा हैदरने आता प्रतिक्रिया दिली आहे. सीमाने सचिन मीणासोबतचा एक व्हिडीओ शेअर करून सत्य सांगितलं आहे. सीमा हैदरने तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंबद्दल पाकिस्तानी मीडियावर जोरदार टीका केली. तो व्हिडीओ खोटा असल्याचं सांगत सीमा म्हणाली की, रमजानच्या महिन्यातही पाकिस्तानी वृत्तवाहिन्या खोटं बोलत आहेत. त्यांना हे समजत नाही की मी यूपीमध्ये महाराज जी (योगीजी) यांच्या संरक्षणात आहे. त्याच्या संरक्षणाखाली कोणतीही स्त्री दुःखी होऊ शकत नाही.
सीमा हैदरचा सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सीमाला बेदम मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये सीमा हैदर रडताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमेच्या खुणा दिसत आहेत. तसेच डोळे देखील खूप सुजलेले दिसत आहेत. हा व्हिडीओची सर्वत्र खूप चर्चा रंगली आहे.
सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ खोटा आहे. जो पाकिस्तानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून बनवण्यात आला आहे. याचा सीमाशी काहीही संबंध नाही. हा व्हिडीओ पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर व्हायरल झाला आहे जो पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. सोशल मीडियावर ज्या प्रकारे हे व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहेत, त्यात पाकिस्तानचे काही तथाकथित चॅनेल आणि यूट्यूबर्सचा समावेश आहे.
सीमा आणि सचिनमध्ये भांडण झालेलं नाही. त्यांच्यात खूप प्रेम असल्याने भांडणाची शक्यता नाही. या व्हिडिओंच्या माध्यमातून सचिन आणि सीमा हैदर यांच्यातील नात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच दरम्यान स्थानिक पोलीस स्टेशन (ग्रेटर नोएडा) ने देखील सीमा हैदर यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आधारे सांगितलं की व्हायरल व्हिडीओ बनावट आहे.
काय म्हणाली सीमा?
सचिनसोबत झालेल्या मारहाणीच्या वृत्तावर सीमा हैदरने सचिनसोबतचा एक व्हिडीओ जारी केला आणि म्हटलं की, "काही पाकिस्तानी वृत्तवाहिन्या खोटं बोलत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यातही पाकिस्तानी मीडिया चॅनेल खोटेपणा करत आहे. माझा नवरा सचिन आमची काळजी घेतो आणि तो माझ्या मुलांवर खूप प्रेम करतो. त्यामुळे अशी घटना माझ्यासोबत घडू शकत नाही कारण सचिनचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी आणि माझी मुलं आनंदाने सचिनसोबत राहतो."