Seema Haider News:पाकिस्तानातून आलेल्या आणि उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या सीमा हैदर बाबत मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. फोन करणार्याने म्हटले की, सीमा हैदर पाकिस्तानात परत न आल्यास भारत उद्ध्वस्त होईल. कॉलरने मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहण्याची धमकी दिली. हा कॉल 12 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सचिन मीना नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर सीमा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली आणि ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. मोबाईलवर ऑनलाइन PUBG गेम खेळत असताना दोघेही प्रेमात पडले. सचिनची ओळख झाल्यानंतर सीमाने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. भारतात आल्यानंतर तिला आणि सचिनला तुरुंगवास झाला, नंतर दोघांना जामीन मिळाला. सध्या दोघेही सोबत राहत आहेत. सचिनसाठी हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा सीमाने केला आहे. सीमाला परत पाकिस्तानात जायचे नाही. पाकिस्तानात गेल्यास तिला मारले जाईल, असे तिचे म्हणणे आहे.
सीमा जैसमाबाद येथील रहिवासी सीमा हैदर पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जैसमाबाद येथील रहिवासी आहेत. कागदपत्रांनुसार तिचा विवाह गुलाम रझा याच्याशी 2014 मध्ये झाला होता. तिला चार मुले आहेत. 2019 मध्ये गुलाम हैदर कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला. 2019 नंतर तो कधीही घरी परतला नाही. 2020 मध्ये सीमाने ग्रेटर नोएडा येथील जेवार गावात राहणाऱ्या सचिनशी PUBG गेमद्वारे मैत्री केली.
कराची ते शारजा, काठमांडूमार्गे भारतात ती 10 मार्च रोजी नेपाळमध्ये आली होती. सीमाने दावा केला की, दोघांनी नेपाळमधील मंदिरातच लग्न केले. लग्नानंतर ती पाकिस्तानात परतली, पण सीमाला सचिनसोबत राहायचे होते. म्हणून 10 मे रोजी ती चार मुलांसह कराची शहरातून शारजाहला पोहोचली. त्यानंतर येथून विमानाने काठमांडूला पोहोचली आणि तिथून खासगी वाहनाने भारतात दाखल झाली. सचिन आणि सीमा दिल्लीतील राबुपुरा भागात भाड्याच्या घरात राहू लागले. पोलिसांना याची माहिती मिळताच दोघांनाही 2 जुलै रोजी अटक करण्यात आली. मात्र, दोघेही सध्या कोर्टातून जामिनावर सुटले आहेत.