नेपाळमार्गे पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरचा पाकिस्तानी पती अतिशय दु:खी आहे. सौदी अरेबियात राहणाऱ्या गुलाम हैदरला चार मुलांची खूप आठवण येत आहे. ज्याच्यामुळे तो रात्रभर झोपत नाही. मुलांसाठी कुठेही जाणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. मग भारतात यावं लागलं तरी चालेल. याआधीही त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये त्याला अचानक आपल्या मुलांची आठवण आली आणि अश्रू अनावर झाले.
यूट्यूबवर गुलाम हैदरने सांगितले की, तो मुलांना खूप मिस करत आहे. "मुलं माझं जीवन आहेत, मी त्यांना सोडू शकत नाही. यासाठी मला भारतात जावं लागलं तरी मी जाईन. सीमाकडे गेल्याच्या दहा दिवस आधी मुलीने प्लॅस्टिकचा स्विमिंग पूल घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. यानंतर मी मुलीला घेईन असं सांगितलं. मी एका मुलाला मोबाईल दिला. मुलाला शाळेत, ट्युशनमध्ये पाठवलं. रोज अनेक वेळा मुलांशी बोलायचो" असं गुलामने सांगितलं आहे.
गुलामने सांगितले की, "तो आणि सीमा यांच्यात सर्व काही ठीक आहे. माझ्यात आणि सीमामध्ये कोणतीही अडचण नव्हती. असं काहीच घडलं नव्हतं. तिला लहान मुलीलाही शाळेत पाठवायचं होतं, पण ती खूप लहान असल्याने मी तिला थांबवलं. सीमा आणि मी मिळून चार मुलांची नावे ठेवली आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खूप अडचणीत आहे. मुलांची आठवण येते. रात्रभर मी मुलांची आठवण काढून रडतो. मी खूप अस्वस्थ आहे. आमचं कुटुंब पुन्हा एकत्र कधी येईल?"
गुलाम हैदरने रिक्षा चालवली, मजूर म्हणून काम केलं, खूप मेहनत घेतली. घरी गेल्याचं पश्चाताप होत नाही. घर पुन्हा घेता येऊल. पण शांतता भंग पावली. मुलांना बळजबरीने नेणं आणि नंतर त्यांना अपमानित करणं खूप वाईट आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खूप अस्वस्थ आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुलांसाठी प्रयत्न करणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं गुलामने स्पष्ट केलं कारण मुलंच त्यांचं जीवन आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.