सीमा हैदरकडे यूपी पोलिसांना पाकिस्तानी पासपोर्ट आणि अनेक मोबाईल फोन मिळाले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांचे स्पेशल डीजी प्रशांत कुमार यांनी याबाबत माहिती दिली. पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरकडे पाच पाकिस्तानी अधिकृत पासपोर्ट पोलिसांना मिळाले आहेत. यासोबतच 4 मोबाईलही सापडले आहेत. याशिवाय 1 असा पासपोर्ट सापडला आहे ज्यावर नाव किंवा आधार नंबर नाही. सीमाजवळ सापडलेले मोबाईल आणि पासपोर्ट तपासण्याचं काम सुरू असल्याचं यूपी पोलिसांचं म्हणणं आहे.
यूपी एटीएसने सचिनचे वडील, सचिन आणि सीमा हैदर यांची चौकशी केली होती. यावेळी सीमाचा मोबाईलही तपासण्यात आला. ज्यामध्ये तिचा सर्व डेटा डिलीट झाल्याचे आढळून आले. सीमाच्या मोबाईलचा डेटा जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सीमाने तिचा लॅपटॉप पाकिस्तानात ठेवला आहे. एवढेच नाही तर तिने पाकिस्तानात वापरलेला फोन भारतात आणलेला नाही. नेपाळमधूनही सीमाने इतर लोकांच्या हॉटस्पॉटवरून Whatsapp कॉल केले. सीमाने तिचा लॅपटॉप पाकिस्तानात का ठेवला, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
सीमा हैदरच्या पाकिस्तानी कागदपत्रावरून निर्माण झालेला सर्वात मोठा प्रश्न तिच्या वयाचा आहे. त्याबाबत सीमा हैदर सातत्याने वेगवेगळी विधाने आणि दावे करताना दिसत आहेत. सीमा हैदर स्वत:ला पाचवीपर्यंत शिकलेली असल्याचे सांगते. सीमाकडे सप्टेंबर 2022 मध्ये बनवलेले ओळखपत्र मिळाले आहे, म्हणजे 2 वर्षांच्या मैत्रीनंतर सचिन मीणा सीमा हैदरच्या प्रेमात पडला होता. मग सीमाने हे कागदपत्र बनवले आणि त्यात तिची जन्मतारीख 1 जानेवारी 2002 लिहिली. त्यानुसार सीमा आता 21 वर्षांची आहे.
दोन्ही कागदपत्रांमध्ये सीमाच्या वयात 6-7 वर्षांचा फरक आहे. हे असं का या प्रश्नांची उत्तरं सीमा देऊ शकत नाहीत. सीमाला पाकिस्तानात बनावट कागदपत्रं मिळाली का? एवढेच नाही तर सीमा हैदरजवळ भारतातही अनेक बनावट कागदपत्रे सापडली आहेत. आता ही कागदपत्रे बनवण्यात तिला कोणी मदत केली याचा शोध तपास यंत्रणांना घ्यायचा आहे. सीमा सातत्याने वेगवेगळे दावे करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.