पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरचे मुंबई ते कराची तिकीट बुक करण्यात आले आहे. यानंतर सीमा हैदर खरोखरच पाकिस्तानात जाणार का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. तर मेरठचे सपा नेते अभिषेक सोम यांनी सीमा हैदरवर चित्रपट बनवण्यास विरोध केला आहे. त्यामुळे अभिषेक यांनी चित्रपट दिग्दर्शक अमित जानी आणि सीमा हैदर यांचे तिकीट बूक केले आहे. हे तिकीट 3 डिसेंबर 2023 चे आहे. तिकीट फक्त सीमा हैदर आणि अमित जानी यांच्यासाठी बुक करण्यात आलं आहे, सीमाच्या चार मुलांसाठी नाही.
सीमा हैदर पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे यूपी एटीएस सीमाची चौकशीही सातत्याने करत आहे. याच दरम्यान, सीमा हैदरच्या मुद्द्यावरून काही लोक वेगवेगळ्या हेतूने प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत आहेत.चित्रपट दिग्दर्शक अमित जानी यांनी अलीकडेच सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर कराची ते नोएडा असं नाव असलेला चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली. यासाठी सीमा आणि सचिनच्या भूमिकांसाठी नोएडामध्ये ऑडिशन्सही घेण्यात आल्या होत्या.
अमित जानी यांनी सीमाला चित्रपटात काम देण्याचेही बोलले आहे. सीमाची स्क्रीन टेस्टही झाली आहे. सीमा हैदरला चित्रपटात कास्ट केल्याची घोषणा झाल्यानंतर सपाचे माजी प्रवक्ते अभिषेक सोम यांनी विरोध सुरू केला. दिग्दर्शक अमित जानी यांनी अभिषेक सोमवर धमकावल्याचा आरोप केला आणि ट्विट करून यूपी पोलिसांकडे तक्रार केली. त्याचवेळी अभिषेकने अमित जानी यांच्यावर नोएडा पोलीस आयुक्तांना अर्ज देऊन वातावरण भडकवल्याचा आरोपही केला.
अमित जानी यांनी ट्विट केले होते की, 'मी जानी फायरफॉक्स मीडिया प्रायव्हेट हाऊस लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे गेल्या वर्षी झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडावर मी एक चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरलाही भूमिका ऑफर करण्यात आली आहे. सीमानेही यासाठी होकार दिला आहे. चित्रपटातील इतर कलाकारांच्या निवडीसाठी कास्टिंग सुरू आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात सीमा हैदरला रॉ एजंटची भूमिका साकारण्यात आली आहे.
अमित जानी यांनी सांगितले की, सपा नेते अभिषेक सोम यांनी हा व्हिडीओ जारी केला आणि सीमाला चित्रपटात काम दिल्याबद्दल धमकी दिली आणि पद्मावत चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्यांनी आपल्या समर्थकांसह चित्रपटाच्या सेटची तोडफोड केली. अमित जानी यांनी यूपी पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली. सध्या सीमा हैदरची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.