शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सीमा हैदरची दुसऱ्या दिवशीही कसून चौकशी, ७० हजाराचा मोबाईल खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 6:57 AM

भारतात येण्यापूर्वी ७० हजार रुपये किमतीचा मोबाइल फोनही खरेदी केला होता, असे तिने चौकशीत सांगितले.

नोएडा : पब्जी गेमच्या माध्यमातून झालेल्या प्रेम प्रकरणातून पाकिस्तानातून थेट भारतात आलेल्या सीमा हैदरची सलग दुसऱ्या दिवशीही दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. भारतात येण्यापूर्वी ७० हजार रुपये किमतीचा मोबाइल फोनही खरेदी केला होता, असे तिने चौकशीत सांगितले.

सीमाने मे महिन्यात बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. आता ती तिचा भारतीय प्रियकर सचिन मीणासोबत ग्रेटर नोएडा येथे राहत आहे, असे पोलिसांनी सांगितले.  अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएसने सीमाचा प्रियकर सचिन यालाही चौकशीसाठी सोबत नेले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने सोमवारी प्रथम सीमा आणि सचिन यांची नोएडा येथील कार्यालयात चौकशी केली आणि रात्री उशिरा त्यांना घरी पाठवले. सीमा (३०) आणि सचिन (२२) यांना पोलिसांनी ४ जुलै रोजी अटक केली; न्यायालयाने ७ जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला.

कसे आले एकत्र? २०१९ मध्ये  ऑनलाइन पब्जी खेळत असताना दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. फोन नंबरची देवाणघेवाण केली. तासनतास ते बोलू लागले.   जानेवारी २०२१ मध्ये दोघांनी आपले प्रेम व्यक्त केले. त्यानंतर सीमा ४ जुलै रोजी नेपाळमार्गे चार मुलांना घेऊन भारतात आली.

टॅग्स :PoliceपोलिसPakistanपाकिस्तानIndiaभारतNepalनेपाळ