पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमस साजरा केल्यानंतर लहान मुलांशी संबंधित व्हिडीओ शेअर केला आहे. या शाळकरी मुलांना मोदींनी आमंत्रित केलं होतं. नरेंद्र मोदींनी निवासस्थानी मुलांशी संवाद साधला. त्यानंतर मुलांना निवासस्थानी भेट देण्यासाठी पाठवले. पीएमओच्या टीमने या मुलांना ऑफिसमधून इतर ठिकाणी नेऊन माहिती दिली. पंतप्रधानांच्या निवासस्थानाची वास्तू आणि सौंदर्य पाहून मुलं खूप आनंदी दिसली.
मुलांना यावेळी पंतप्रधान झाल्यानंतर निवासस्थानी येण्याबाबत विचारले असता एका मुलीने उत्तर दिलं की, मलाही पंतप्रधान व्हायचं आहे. मोदींनी याबाबत ट्विट केलं असून यामध्ये माझं ऑफिस अल्टीमेट टेस्टमध्ये पास झालं असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी ख्रिसमसनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुपारी जेवणाला अनेकांनी हजेरी लावली.
अभिनेता डिनो मोरिया देखील पाहुण्यांमध्ये होता. पंतप्रधानांनी येथे सर्वांचे जोरदार स्वागत केले. लोकांशी संवाद साधला. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना मुलांनी घेरलेले दिसत आहे. मुलांनी सर्वप्रथम मोदींना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पंतप्रधान मुलांशी बोलले आणि पंतप्रधानांनी विचारले, तुम्ही पंतप्रधानांचे निवासस्थान पाहिलं आहे का? मुलांनी 'नाही' असे उत्तर दिल्यावर त्यांनी आपल्या टीमसोबत मुलांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी पाठवलं.
मुलं मीटिंग हॉलमध्ये पोहोचली. यावेळी मुले खूप मस्ती करताना दिसली. पंतप्रधानांचे निवासस्थान पाहून खूप आनंद झाल्याचं मुलांनी सांगितले. ही आमच्यासाठी मोठी संधी होती. मला आशा आहे की भविष्यातही अशा अनेक संधी येतील. आम्ही खूप उत्सुक होतो असं मुलांनी म्हटलं. शेवटी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.