जलशिवारसाठी २२२ गावांची निवड
By admin | Published: January 02, 2016 8:30 AM
जळगाव- जलयुक्त शिवार अभियानातून पाणी अडविण्यासह इतर कामे घेण्यासाठी जिल्हाभरातील २२२ गावांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव- जलयुक्त शिवार अभियानातून पाणी अडविण्यासह इतर कामे घेण्यासाठी जिल्हाभरातील २२२ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये कामे घेण्यासंबंधी संबंधित ग्रा.पं.ची मान्यता १० जानेवारीपर्यंत घेऊन त्यास जिल्हा समितीने मान्यता द्यायची आहे. याबाबत राज्याच्या जलसंधारण विभागाच्या सचिवांनी जि.प.ला निर्देश दिले आहेत. शिवार फेरी घ्याजलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट केलेल्या गावांमध्ये शिवार फेरी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित ग्रा.पं.कडून मान्यता घेऊन आराखडा तयार करण्यासंबंधी पं.स.ला सूचना दिल्याची माहिती जि.प.प्रशासनाने दिली.