ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 10 - सेल्फी काढण्याच्या नादात जीव धोक्यात घालून आपला जीव गमावणा-या सेल्फी वेड्यांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांत सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. 'पर्यटनस्थळांवर सेल्फी काढताना जीव जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सरकारने पर्यटनस्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करण्याचे राज्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे.
महेश शर्मा यांनी सर्व राज्यांना यासंबंधी पत्र लिहिलं आहे. महेश शर्मा यांनी पर्यटनस्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करुन तशा सूचना करण्याचे निर्देश देण्यासंबंधी पत्रात लिहिलं आहे. या ‘सेल्फी डेंजर झोन’वर सीसीटीव्ही लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत