शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

'सरकारी मालमत्ता विका आणि सरकार चालवा' हेच धोरण; शिवसेनेचा केंद्राविरुद्ध संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 8:47 AM

सरकारकडून सध्या प्राधान्याने आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येते.

मुंबई - केंद्र सरकारला दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करावयाचे आहे. त्यासाठी, अर्थ विभागाने प्रयत्नही सुरू केले असून ३१ मार्च २०२४ पर्यंत म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वीच या बँकांचे खासगीकरण होऊ शकते. त्यासाठी, सरकारला बँकींग कायद्यात बदल करावे लागणार आहेत. सरकारच्या या खासगीकरणाच्या धोरणावरच शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून 'खासगीकरणाचा वरवंटा' या मथळ्याखाली अग्रलेख लिहित केंद्रातील मोदी सरकार आणि त्यांच्या खासगीकरणाविरोधातील धोरणाला कडाडून विरोध दर्शवला आहे. 

सरकारकडून सध्या प्राधान्याने आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येते. तर, आणखी एक म्हणजेच दोन बँकांच्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यावरुन, शिवसेनेनं संताप व्यक्त करत मोदी सरकारवर प्रखर शब्दात टीका केली. मागील सात दशकांत देशाने जे जे उभे केले, कमावले ते ते सगळे मोडीत काढायचे, विकायचे. त्यावर खासगीकरणाचा वरवंटा फिरवायचा, हेच धोरण गेल्या सात वर्षांत राबविले जात आहे, असे म्हणत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

'नवसंजीवनी'च्या मुखवटय़ाआड दडलेला मोदी सरकारचा 'चेहरा' हा असा भयंकर आहे. नाहीतरी लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक सौहार्द्र, जातीय-धार्मिक सलोख्यापासून कायद्याच्या राज्यापर्यंत सगळय़ांचा 'लिलाव'च या सरकारने मांडला आहे. त्यात आणखी काही सरकारी बँकांचा आता 'पुकारा' होणार आहे. मागील सात दशकांत देशाने जे जे उभे केले, कमावले ते ते सगळे मोडीत काढायचे, विकायचे. त्यावर खासगीकरणाचा वरवंटा फिरवायचा, हेच धोरण गेल्या सात वर्षांत राबविले जात आहे.

शेतकऱ्यांनी डाव उधळून लावला

मोदी सरकारच्या या रोखीकरणाच्या त्सुनामीमध्ये देशाचे 'मानचिन्ह' ठरलेल्याएअर इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशनसारख्या कंपन्यांपासून सरकारी बँका, कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रम, प्रवासी रेल्वे आणि स्थानके, विमानतळ, रस्ते, स्टेडियम, गॅस, वीज, विमा कंपन्यांपर्यंत सगळेच आतापर्यंत वाहून गेले आहे. अगदी सरकारी कंपन्यांच्या जमिनीही विक्रीला काढल्या जात आहेत. नवीन शेती कायद्यांच्या माध्यमातून शेती आणि सामान्य शेतकऱ्यांवरही खासगीकरणाचा नांगर फिरविण्याचे मोदी सरकारचे मनसुबे होते, परंतु देशभरातील शेतकरी एकजुटीने ते उधळले गेले. 

सरकारी मालमत्ता विका आणि देश चालवा

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 'नवसंजीवनी' देण्याचा उद्देश या धोरणामागे असल्याचा दावा आणि वादा केंद्र सरकार नेहमीच करीत असते. मात्र 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या व्यापारी वृत्तीने 'सरकारी मालकी हक्का'चा लिलाव मोदी सरकारकडून केला जात आहे. गेल्या वर्षी देशातील 10 सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करून चार मोठय़ा बँकांची स्थापना करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील आणखी दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते. मात्र, कोविड लाटेमुळे या बँका सरकारच्या तडाख्यातून बचावल्या होत्या. तथापि, त्यांच्याशिवाय काही मध्यम आणि छोटय़ा सरकारी बँकांचे अस्तित्व आता पुसले जाऊ शकते. कारण सरकारच्या रडारवर मोठय़ा बँकांनंतर मध्यम आणि लहान बँका आहेत. मुळात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून 'सरकारी मालमत्ता विका आणि सरकार चालवा' हेच धोरण राबविले जात आहे. त्यासाठी सरकारी मालमत्तांचे 'मॉनिटायझेशन' म्हणजे 'रोखीकरण' करण्याची घोषणा केली गेली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकारbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र