नीलगिरी: गुन्हे केल्यानंतर आरोपीची रवानगी तरुंगात होत असते. तुरुंगात कैद असलेल्या आरोपींना कधी एकदा तुरुंगातून सुटतो असे वाटत असते. पण, एका हत्या आणि दरोडा प्रकरणातील आरोपीने बाहेर सुटल्यानंतर आता पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्याने रितसर याचिकाही दाखल केली आहे आणि न्यायालयाकडे पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे.
आरोपी जामिनावर बाहेरतामिळनाडूतील कोडनाडू इस्टेट दरोडा-हत्या प्रकरणातील या आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन पुन्हा कारागृहात पाठवण्याची विनंती केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शहरात घर व काम मिळत नसल्याचे आरोपीने सांगितले आहे. तो गेल्या नोव्हेंबरपासून सशर्त जामिनावर असून त्याला शहर न सोडण्याचे आणि दर सोमवारी कोर्ट रजिस्टरवर सही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राहण्याची सोय नसल्याचे कारण
जामिनाच्या अटींची पूर्तता करू न शकल्याने पुन्हा कारागृहात पाठवण्याची विनंती आरोपीने याचिकेत केली आहे. उगमंडलममध्ये आपल्याला कोणतीही नोकरी किंवा राहण्याची योग्य सोय मिळाली नाही. हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्येही राहण्यासाठी खोली देत नाहीत, असे आरोपीने म्हटले आहे. तसेच, प्रकृती खालावल्याचे कारणही आरोपीने याचिकेत दिले आहे.
जयललिता यांचे निवासस्थानया सर्व कारणांमुळेच आरोपीला पुन्हा तुरुंगात जायचे आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता कोडनाडू इस्टेट वापरत असत. 2016 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर आरोपीने तेथील एका सुरक्षा रक्षकाची हत्या आणि दुसऱ्याला जखमी करुन मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला होता.