भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन, काही दिवसापासून आजारी होते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 09:44 AM2024-07-26T09:44:57+5:302024-07-26T10:03:28+5:30

मध्य प्रदेशमधील भाजपाचे वरिष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन झाले.

Senior BJP leader Prabhat Jha passed away was ill for a few days | भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन, काही दिवसापासून आजारी होते

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन, काही दिवसापासून आजारी होते

मध्य प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रभात झा यांचे निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. ते मुळचे बिहारचे आहेत. 

दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले भाजप नेते प्रभात झा यांनी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भाजपमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. दिल्ली, पंजाब आणि चंदीगडचे प्रभारीही होते.

काशी विश्वनाथमध्येही झाला सोन्याचा घोटाळा, तपास करा: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज

प्रभात झा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी बिहारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव विशेष विमानाने बिहारमधील सीतामढी येथे नेण्यात येणार आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ट्विटरवर एक पोस्ट करुन माहिती दिली. 'माजी प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. त्यांच्या शोकाकुल परिवाराला हे दुख: सहन करण्याची शक्ती देवो. मध्य प्रदेशच्या विकासातील त्यांची महत्त्वाची भूमिका आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांच्या निधनाने राजकीय जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे. ओम शांती!, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

प्रभात झा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी बिहारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. आज संध्याकाळी त्यांना विशेष विमानाने बिहारमधील सीतामढी येथे नेण्यात येणार आहे.

Web Title: Senior BJP leader Prabhat Jha passed away was ill for a few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.