Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 02:25 PM2019-08-26T14:25:20+5:302019-08-26T14:26:04+5:30

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती.

Senior BJP leaders die for 'this' cause; Pragya Singh Thakur falsely accused on Opposition | Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

googlenewsNext

भोपाळ - भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्यांच्या निधनामागे विरोधी पक्षावर भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गंभीर आरोप लावला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी विरोधी पक्षावर मारक शक्तीचा प्रयोग आरोप केला आहे. या मारक शक्तीचा प्रयोग केल्यानेच भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा मृत्यू झाला आहे असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हटलं आहे. एका सन्यासाने मला सांगितले की, भाजपा नेत्यांना निशाणा बनविला जात आहे असा दावा प्रज्ञा सिंह ठाकूरने केला आहे.  

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. यात प्रदेश भाजपाच्या नेत्यांनी दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या दरम्यान भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही भाजपा नेत्यांबाबत शोक व्यक्त भाजपा नेत्यांच्या मृत्यूला विरोधी पक्षाने केलेली मारक शक्तीचा प्रयोग जबाबदार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, मी जेव्हा निवडणूक लढवित होते त्यावेळी एक महाराज आले होते. त्यांनी मला सांगितले की, वेळ खूप खराब आहे, तुमची साधना वाढवा. विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग तुमच्या पक्षावर आणि नेत्यांवर करत आहे त्यामुळे सावधान राहा असं सांगितले. 

त्या महाराजांनी सांगितलेल्या गोष्टीचा मला विसर पडला होता. मात्र मी आज बघतेय की, आपल्या पक्षाचे नेते एकापाठोपाठ एक आपल्याला सोडून जात आहेत. त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं खरं आहे का? असं मला वाटायला लागलं आहे असा दावा प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. 
 

Web Title: Senior BJP leaders die for 'this' cause; Pragya Singh Thakur falsely accused on Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.