शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मंत्र्याची जीभ घसरली; म्हणाले- वृद्ध दगावले तरी हरकत नाही, मुलांना मिळायला हवी होती लस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 2:41 PM

"आपल्याला माहीत आहे का, लस कुणाला दिली जाते. आपल्या देशात आजवर कोणतीही लस केळव मुलांनाच देण्यात आली आहे. वृद्धांना लस कुठे लागते?"

जयपूर - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक नेत्यांनीही कोरोना व्हायरस आणि कोरोना लशीसंदर्भात आपापले ज्ञान पाझळायचा प्रयत्न केला आहे. यातच आज, कोरोना महामारी आणि लसीकरणासंदर्भात बिनबुडाचे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या यादीत राजस्थानचे जल आणि उर्जामंत्री बीडी कल्ला यांचेही नाव आले आहे. त्यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात भाष्य केले आहे.

बीडी कल्ला म्हणाले, आपल्याला माहीत आहे का, लस कुणाला दिली जाते. आपल्या देशात आजवर कोणतीही लस केळव मुलांनाच देण्यात आली आहे. वृद्धांना लस कुठे लागते?कोरोनातही सर्व प्रथम मुलांनाच लस टोचली जायला हवी. कारण मुले सुरक्षित असणे आवश्यक आहे. मोदी सरकारने कोरोना लस वृद्धांना द्यायला सुरू केले. 

CoronaVaccine: कोरोना लशीच्या देन डोसमधील अंतर वाढवल्यास संक्रमणाचा धोका अधिक; डॉ. अँथनी फाउची यांचा इशारा!

कल्ला पुढे म्हणाले, मी स्वतः वृद्ध लोकांना बोलताना ऐकले आहे, की आम्ही तर असेही 80-85 वर्षांचे झालोच आहोत. आमचा कोरोनाने मृत्यूही झाला तरी काही हरकत नाही. मात्र, मुले सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यामुळे सर्वप्रथम मुलांना लस देण्यात यावी. मंत्री मोहोदय एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी केंद्र सरकारवरही हल्ला चढवला.

कल्ला म्हणाले, पंतप्रधान मोदींचे लसीकरण धोरण चुकीचे आहे. लस आली तर ती सर्वप्रथम मुलांना टोचायला हवी. मात्र, मोदी सरकारने असे केले नाही. यामुळेच समस्या एवढी वाढली आहे.

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार -केंद्रीय जल संसाधन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानचे मंत्री बीडी कल्ला यांच्या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे. ते म्हणाले, लशीसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांचे हास्यास्पद ज्ञान आणि वक्तव्य ऐका. एवढेच नाही, तर आता काँग्रेस व्हॅक्सीन राजकारणावरून क्लाउन राजकारणावर आली आहे, असेही शेखावत म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लसRajasthanराजस्थान