काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून सन्यास; सोनिया गांधींना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 03:55 PM2022-03-09T15:55:18+5:302022-03-09T15:55:51+5:30

एके एंटनी पहिल्यांदा १९७० मध्ये केरळमधून आमदार बनले होते. मागील ५२ वर्ष ते सक्रीय राजकारणात आहेत

Senior Congress leader Ak Antony retires from politics; Letter to Sonia Gandhi | काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून सन्यास; सोनिया गांधींना लिहिलं पत्र

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून सन्यास; सोनिया गांधींना लिहिलं पत्र

Next

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके एंटनी(Ak Antony) यांनी राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पुढे ते एकही निवडणूक लढवणार नाहीत. एके एंटनी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून सक्रीय राजकारणातून सन्यास घेत असल्याचं कळवलं आहे. एके एंटनी हे राज्यसभेचे खासदार आहेत. २ एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे.

एके एंटनी पहिल्यांदा १९७० मध्ये केरळमधून आमदार बनले होते. मागील ५२ वर्ष ते सक्रीय राजकारणात आहेत. मागील वर्षी केरळ विधानसभेत झालेल्या निवडणुकीत एंटनी यांनी म्हटलं होतं की, ते आता राजकीय जीवनातून निवृत्त होऊ इच्छितात. ८१ वर्षीय एके एंटनी यांनी याबाबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मी सोनिया गांधी यांना अनपौचारिक माहिती दिली होती असं त्यांनी म्हटलं.

दिल्लीत राहणार नाही

सन्यास घेण्यापूर्वी एके एंटनी(AK Antony) यांनी सांगितले आहे की, आता ते दिल्लीत राहणार नाही. निवृत्तीनंतर तिरुवनंतपुरम येथे शिफ्ट होणार आहे. मला पक्षाने खूप संधी दिली. मी नेहमी काँग्रेसचा आभारी राहीन. आता मी एप्रिलपासून दिल्ली सोडून तिरुवनंतपुरमला जाणार आहे.   

Web Title: Senior Congress leader Ak Antony retires from politics; Letter to Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.