शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

ज्येष्ठ भाकपा नेते कॉम्रेड बर्धन कालवश

By admin | Published: January 03, 2016 5:15 AM

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते अर्द्धेन्दू भूषण उपाख्य भाई बर्धन यांचे शनिवारी रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीची मोठी हानी झाली असून देश

नवी दिल्ली: भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते अर्द्धेन्दू भूषण उपाख्य भाई बर्धन यांचे शनिवारी रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीची मोठी हानी झाली असून देश एका अभ्यासू आणि प्रामाणिक नेत्यास मुकला आहे.९२ वर्षीय बर्धन यांना गेल्या महिन्यात पक्षाघातानंतर उपचारार्थ येथील जी.बी. पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली. त्यांचा रक्तदाब कमी झाला. रात्री ८ वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती पंत हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी विभागाचे संचालक आणि प्रोफेसर डॉ. विनोद पुरी यांनी दिली. बर्धन यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अशोक आणि मुलगी अल्का आहे. बर्धन यांचे पार्थिव इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. रविवारी पक्षाच्या मुख्यालयात अजय भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होतील. भाई बर्धन... धगधगते यज्ञकुंडभाई बर्धन ! नागपूरला कर्मभूमी बनवून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणारा अत्यंत प्रामाणिक, सचोटीचा, निष्कलंक नेता. स्वातंत्र्यानंतर देशात अनेक राजकीय स्थित्यंतरे झालीत. वेगवेगळ्या चळवळींनी वेगवेगळे नेते घडविले. काही नेते लोकप्रियतेच्या लाटांवर आरुढ होऊन सत्तापदापर्यंत गेले तर काळाच्या ओघात अनेक नेते उपेक्षेच्या तळाशी गेले. परंतु या सर्व घडामोडींमध्ये उपराजधानीतील एका नेत्याची प्रतिमा ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ राहिली. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा, विचार आणि चळवळीची भूमिका आयुष्यभर एकनिष्ठ राहिली. कम्युनिस्ट नेते भाई अर्धेंदुभूषण बर्धन यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचा एक धगधगता प्रवास होता.१९४० मध्ये ‘आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन’च्या निमित्ताने भाई बर्धन यांनी स्वीकारलेली मार्क्स-लेनिन विचारसरणीवरील निष्ठा आयुष्यभर तेवढीच प्रखर राहिली. १९२४ साली कॉम्रेड बर्धन यांचा जन्म जरी आताच्या बांगला देशमधील सिलहट येथील असला तरी त्यांच्यातील प्रामाणिक कॉम्रेड नागपूर शहरात वाढला, मोठा झाला. महाविद्यालयीन जीवनात बर्धन वादविवादपटू म्हणून ओळखले जायचे. पटवर्धन शाळेत त्यांनी त्यांच्या वक्तृत्वाची चुणूक दाखविली होती.१९४० च्या सुमारास विद्यार्थी आंदोलनात बर्धन हे ‘आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’मध्ये प्रमुख कार्यकर्ते होते. ‘इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स’मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता परंतु आंदोलनामुळे त्यांना महाविद्यालय सोडावे लागले. त्यानंतर नागपूर विद्यापीठात त्यांनी बीएमध्ये प्रवेश घेतला. परंतु ‘कम्युनिस्ट’ असल्याचे कळताच त्यांना काढण्यात आले. अखेर बिंझाणी महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. ‘एलएलबी’ची पदवी घेतली पण त्यांनी आयुष्यात कधीच वकिली केली नाही. कधीही वकिलांचा काळा कोट चढविणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली होती. याच काळात बर्धन यांच्यातील नेता तसेच समाजकारण्याला पैलू पडत गेले. विद्यार्थी जीवनातच ते विद्यार्थी आंदोलनात सक्रिय तर होतेच. नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या ‘स्टुडंट युनियन’चे नेते म्हणून त्यांची निवड झाली. १९४२ साली झालेल्या भारत छोडो आंदोलनात बर्धन यांची सक्रिय भूमिका होती. १२ आॅगस्ट १९४२ रोजी हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा कस्तूरचंद पार्कपासून निघून जिल्हा कचेरीवर गेला होता व युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकविला होता. या मोर्चात ए.बी.बर्धन आघाडीवर होते. त्यांना कारावासदेखील भोगावा लागला. त्यांनी संपूर्ण जीवन समाजासाठी देण्याचे ठरविले व हा त्यांच्यासाठी एक दिशा देणारा क्षण ठरला. मार्क्सवाद, लेनिनवादाचा त्यांनी सखोल अभ्यास केला व कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली बर्धन यांनी आपले सर्व जीवन कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यासाठी वाहिले. स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षांचीही स्थापना ही वैचारिक प्रणालीच्या आधारावर झाली. कामगार चळवळ व विद्यार्थी चळवळदेखील विभागली गेली. त्यावेळी नागपूर व मध्यप्रदेशमध्ये दिवंगत रामभाऊ रुईकर यांच्या नेतृत्वात कामगार आंदोलन, गिरणी कामगार आंदोलन फार प्रभावी होते. रुईकरांच्या नेतृत्वात बर्धन त्यात सहभागी झाले. तत्कालीन कपडे कामगार, सफाई कामगार, खाण कामगार इत्यादींना संघटित करून संघर्षाला सुरुवात केली,१९५४ साली रुईकर यांच्या निधनानंतर संघटनेत बर्धन यांनी त्याच चिकाटीने काम सुरू ठेवले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी बर्धन यांनी नागपूर व विदर्भात भ्रमण केले. बर्धन यांनी कामगार आंदोलनासोबतच असंघटित विणकर,महिला, आदिवासी, शेतकरी यांनादेखील संघटित करण्यात मोलाचा वाटा उचलला. पुढे बर्धन हे १९५७ साली महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे सदस्य म्हणून नागपूर द्विसदस्यीय निवडणूक क्षेत्रातून निवडून आले. आपल्या कार्यकाळात त्यांनी नागपूर तसेच विदर्भाच्या विकासाच्या अनेक योजनांच्या संकल्पना मांडल्या. १९५७ ते १९६२ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, टी.सी.कारखानीस, विष्णूपंत चितळे, यशवंतराव चव्हाण इत्यादी समकालीन नेत्यांसोबत त्यांनी काम केले. संसदीय व्यासपीठावर पहिल्यांदाच वावरत असताना त्यांच्यात कधीही नवखेपणा जाणवला नव्हता. विदर्भाचे प्रश्न, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मॉÞडेल मिल कामगारांच्या समस्या त्यांनी हिरीरीने सभागृहासमोर सातत्याने मांडल्या. त्यांच्या भाषणांना तत्कालीन दिग्गज नेते गंभीरतेने लक्ष देऊन ऐकायचे. परंतु त्यानंतर बर्धन यांना निवडणुकांमध्ये यश मिळाले नाही. याला निरनिराळी कारणे होती. बर्धन यांनी लोकसभेसाठी १९६७, १९८० आणि १९८९ असे तीनदा नशीब अजमावले, मात्र तिन्हीवेळा त्यांच्या पदरी अपयश आले. १९६७ मध्ये त्यांना काँग्रेसचे नरेंद देवघरे यांनी मात दिली. बर्धन यांनी पुन्हा एकदा १९८० मध्ये निवडणूक लढवली. मात्र यावेळी काँग्रेसने विदर्भातल्या सर्वच्या सर्व ११ जागा जिंकत झंझावाती विजय मिळवला. वसंत साठे यांनी रिपब्लिकन पार्टीचे जांबुवंतराव धोटे यांना पराभूत केले. या लढतीत बर्धन तिसऱ्या स्थानावर होते. १९८९ मध्ये काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पराभूत केले. निवडणुकांच्या राजकारणात त्यांना अपयश येत असले तरी कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे काम अव्याहतपणे सुरू होते. १९९० साली ते दिल्लीच्या राजकारणात उतरले व १९९४ साली त्यांना ‘आयटक’चे (आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस) सरचिटणीस बनविण्यात आले. या पदावर लाला लाजपतराय, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, व्ही.व्ही.गिरी, रामभाऊ रुईकर, श्रीपाद अमृत डांगे यांची परंपरा लाभली होती. १९९६ साली भाकपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष केंद्राच्या सत्तेत प्रथमच सहभागी झाला. बर्धन यांनी सक्षमपणे १६ वर्षांच्या प्रदीर्घ काळासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची धुरा सांभाळली. वयोमान झाल्यामुळे बर्धन यांनी २०१२ पदाचा राजीनामा दिला व आंध्र प्रदेशचे एस.सुधाकर रेड्डी यांच्याकडे जबाबदारी सोपविली. यानंतरदेखील बर्धन यांच्यातील ‘कॉम्रेड’ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटचा श्वास घेईपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाशी बोलून ते समस्या जाणून घेतात. निरनिराळ्या विषयावर अखेरपर्यंत त्यांचा अभ्यास सुरू होता. काळ बदलला, परिस्थितीदेखील बदलली. नेते आले, बदल झाले. पण बर्धन विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. कॉम्रेड बर्धन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२४ साली आताच्या बांगला देशमधील सिलहट येथे झाला. परंतु नागपूरला त्यांनी आपली कर्मभूमी बनविले होते. राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणारा अत्यंत प्रामाणिक, सचोटीचा, निष्कलंक नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. बर्धन यांच्या शिक्षणाची सुरुवात नागपुरातून झाली.कम्युनिस्ट पक्षाने जनसंघटनांची लढाऊ फळी उभी केली होती. तरुणांनी आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनची स्थापना केली. या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या फळीत भाई बर्धन यांचा समावेश होता. १९४० मध्ये ते अवघ्या १५ व्या वर्षी भाकपाचे सभासद झाले होते. त्यांनी सातवेळा तुरुंगवास भोगला होता. ४ जून १९५२ रोजी बर्धन यांनी पद्माताई यांच्याशी नागपुरातील न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.ध्येयवादी नेता हरपला...कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते भाई बर्धन यांच्या निधनाने कष्टकरी कामगारांसाठी लढणारा एक प्रामाणिक आणि ध्येयवादी नेता गमावला आहे. विद्यार्थीदशेपासूनच कामगार चळवळीत काम करणाऱ्या बर्धन यांनी त्यासाठी अनेक लढे उभारले. कुठल्याही परिणामांची पर्वा न करता आणि तत्त्वांशी तडजोड न करता ते या मूल्यांसाठी आयुष्यभर लढत राहिले. विदर्भातील कामगार चळवळीला त्यांनी नवी दिशा दिली. या वर्गासाठी संघर्ष करीत असतानाच विधायक कल्याणाचा वसाही त्यांनी जोपासला. नागपूर आणि विदर्भासह देशाने एक नि:स्पृह नेता गमावला. त्यांची उणीव सतत जाणवत राहील. - खा. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत वृत्तपत्र समूह भाई बर्धन यांच्या निधनाने देशातील डाव्या आंदोलनाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. - सुधाकर रेड्डी, महासचिव, भाकपाबर्धन यांच्या निधनाने आम्ही एक महान डाव्या नेत्यास मुकलो आहोत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. त्यांच्यासारखा प्रामाणिक आणि निष्कलंक नेता मिळणे कठीण आहे. सर्व सुखांना तिलांजली देऊन जीवनभर ते पक्ष कार्यालयात राहिले आणि शोषित पीडितांच्या हक्कासाठी लढा दिला.- अतुल अंजानकम्युनिस्ट चळवळीतील अग्रणी नेतृत्व आणि प्रारंभापासून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा नेता ए.बी.बर्धन यांच्या निधनाने आपण गमावला आहे. ते अतिशय प्रामाणिक मनाचे, सर्वसामान्य जनतेचा कायम विचार करणारे आणि पक्षभेद विसरून ज्यांच्या शब्दाला साऱ्याच पक्षांमध्ये मान्यता होती असे व्यक्तिमत्व होते. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीकामगार चळवळीला दिशा देणारा अमोघ वाणीचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अत्यंत साधी राहणी आणि चिंतनशील व्यक्तिमत्व हरपले. - हरीभाऊ बागडे, विधानसभेचे अध्यक्ष