गांधीनगर - कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनसंदर्भातील कॉर्डिनेशनसाठी अनेक ठिकाणी विविध व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये देखील असाच पद्धतीचा एक अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. मात्र यामध्ये एका महिला IAS अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. व्हॉट्सअॅप ग्रुपमधील एका रिटायर्ड IAS अधिकाऱ्याने महिला IAS अधिकाऱ्यांसोबतचा एक न्यूड फोटो शेअर केल्याने सर्वांनाच धक्का बसला.
रिटायर्ड IAS अधिकारी हे सध्या सरकारमधील एका संवेदनशील पदावर कार्यरत आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुरुवारी रात्री अचानक त्यांनी काही आक्षेपार्ह फोटो आणि गोष्टी पोस्ट केल्या. व्हॉट्सअॅवर आलेले असे फोटो पाहून सर्वच जण हैराण झाले आणि त्यांनी अधिकाऱ्याला तातडीने हे सर्व फोटो हटवण्यास सांगितले. मात्र तरीही पोस्ट हटवली गेली नाही. त्यानंतर अधिकाऱ्याला अनेकांनी कॉल करून सांगितल्यावर त्याने ती आक्षेपार्ह पोस्ट डिलिट केल्याची माहिती मिळत आहे.
एक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या माहितीसाठी हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. यावर कोणालाही त्यांची वैयक्तीक माहिती पोस्ट करता येणार नाही. मात्र जेव्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशा पद्धतीने न्यूड फोटो आणि आक्षेपार्ह माहिती पोस्ट केल्याने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर याची चर्चा होती. अधिकाऱ्याने हे फोटो मुद्दाम पोस्ट केले की ते चुकून ग्रुपमध्ये पोस्ट झाले याबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू
CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा
'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल
कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया
CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट