शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

तीन विद्यार्थिनींच्या आत्महत्येने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 2:01 AM

अव्वाच्या सव्वा फी व अन्याय्य वागणूक याबद्दल व्यवस्थापनावर दोषारोप करून तामिळनाडूच्या विल्लुपूरम जिल्ह्यातील एका खासगी निसर्गोपचार व योगा महाविद्यालयातील

चेन्नई : अव्वाच्या सव्वा फी व अन्याय्य वागणूक याबद्दल व्यवस्थापनावर दोषारोप करून तामिळनाडूच्या विल्लुपूरम जिल्ह्यातील एका खासगी निसर्गोपचार व योगा महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. टी. मनीषा, ई. सरन्या आणि व्ही. प्रियंका या १९ वर्षांच्या तिघी जणींनी एकमेकींना दुपट्ट्याने बांधून घेऊन कॉलेजच्या आवारातील विहिरीत उड्या मारल्या.हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाने देशभरात गदारोळ उठलेला असतानाच तामिळनाडूमधील या तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एसव्हीएस निसर्गोपचार आणि योगशास्त्र या खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील तिन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह शनिवारी रात्री एका विहिरीत सापडले. या विद्यार्थिनींनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठीही सापडली असून, त्यामध्ये अव्वाच्या सव्वा फी वसूल करण्यात आल्याचा व अन्याय्य वागणूक मिळत असल्याचा आरोप करून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला दोषी धरले आहे. व्यवस्थापनाने धक्कादायक निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष शोक्कर वर्मा यांच्या पुत्रालाही अटक केली आहे.विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सामना करीत असलेले हैदराबाद सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव पोदिले हे रविवारपासून रजेवर गेले आहेत. ‘विद्यापीठात रोहित वेमुलाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आपल्याला काही काळाकरिता विद्यापीठ कॅम्पसपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे,’ असे सांगत अप्पा राव रजेवर गेले आहेत.‘कुलगुरू रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी वरिष्ठ प्राध्यापक विपिन श्रीवास्तव हे २४ जानेवारीपर्यंत विद्यापीठाचे कामकाज सांभाळतील,’ असे विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे. तथापि, अप्पा राव हे नेमक्या किती दिवसांच्या रजेवर गेले आहेत, याचा या वेबसाईटवर खुलासा करण्यात आला नाही.जेएनयूच्या विद्यार्थ्यांचेही आमरण उपोषण1 हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या विरोधात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) तीन विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण आरंभिले आहे. 2 सुचिश्री, लेनिनकुमार आणि शेभांशू, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून अन्य विद्यार्थी साखळी उपोषण करणार आहेत.