शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

सेन्सेक्स १७0 अंकांनी घसरला

By admin | Published: April 29, 2015 11:30 PM

बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा आपटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७0.४५ अंकांनी घसरून २७,२२५.९३ अंकांवर बंद झाला.

मुंबई : बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा आपटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७0.४५ अंकांनी घसरून २७,२२५.९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५.८५ अंकांनी घसरून ८,२३९.७५ अंकांवर बंद झाला.मंगळवारी शेअर बाजारांत सुधारणा झाली होती. सेन्सेक्स २१९ अंकांनी वाढला होता. मात्र हे सकारात्मक वातावरण बाजाराला टिकवून ठेवता आले नाही. एप्रिलमधील डेरिव्हेटिव्ह करारांची मुदत उद्या संपत आहे. त्याच बरोबर विदेशी संस्थांकडून बाजारात विक्रीचा मारा झाला. याचा फटका बाजाराला बसला. भूमी अधिग्रहण विधेयकाला केंद्राकडून विलंब होत असल्यामुळेही बाजारावर दबाव वाढत आहे. भारती एअरटेलची मार्चला संपलेल्या तिमाहीतील कामगिरी समाधानकारक राहिली नाही. त्याचा मोठा फटका आज कंपनीला बसला. कंपनीचा समभाग ३.३२ टक्क्यांनी घसरला. या तिमाहीत कंपनीला ३0.५ टक्के वाढीसह १,२५५ कोटींचा नफा झाल्याचे काल जाहीर करण्यात आले होते. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळीच नरमाईने २७,३९५.७१ अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो आणखी घसरून २७,१७६.५४ अंकांवर गेला. नंतर त्यात थोडी सुधारणा झाली होती. तथापि, दुपारच्या सत्रात विक्रीचा जोर वाढल्यामुळे सेन्सेक्स सत्र अखेरीस २७,२२५.९३ अंकांवर बंद झाला. १७0.४५ अंक अथवा 0.६२ टक्के घसरण त्यात झाली. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५.८५ अंक अथवा 0.५५ टक्क्यांच्या घसरणीसह ८,२३९.७५ अंकांवर बंद झाला.तत्पूर्वी तो सतत खाली-वर होत होता. सध्या बाजार दबावात आहे. सकारात्मक अशी कोणतीही बाब सध्या गुंतवणूकदारांना बाजारात दिसत नाही, असे ब्रोकरांनी सांगितले. आशियाई बाजारात नरमाईचा कल दिसून आला. युरोपीय बाजारातही सकाळच्या सत्रात नरमाईचा कल राहिला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या दोनदिवसीय बैठकीचे सावट बाजारावर दिसून आले. ४सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे समभाग घसरले. केवळ ७ कंपन्यांचे समभाग वर चढले. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक मात्र वर चढल्याचे दिसून आले. स्मॉलकॅप १.१0 टक्क्यांनी, तर मिडकॅप 0.३९ टक्क्यांनी वाढला. तत्पूर्वी काल विदेशी संस्थांनी १,५३२.८४ कोटी रुपयांचे समभाग विकले.