केंद्रातील मोदी सरकारनं सहकार क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशात आता सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. 'सहकार से समृद्धी' या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणाला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय असावं या उद्देशातून हे नवं मंत्रालय सुरू करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. (A separate ‘Ministry of Co-operation’ has been created by PM Narendra Modi-led Central Government)
देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर बाबी आणि धोरणात्मक चौकट निर्माण करण्याचं काम सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत केलं जाणार आहे. दरम्यान, या मंत्रालयासाठीची मंत्रिपदाची नियुक्ती देखील उद्याच्याच मंत्रिमंडळ विस्तारात केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशाचं केंद्रीय सहकार मंत्रिपद नेमकं कुणाला मिळणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.