शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

फुटीरतावाद्यांना चपराक, लष्कराच्या परीक्षेला बसले 800 काश्मिरी तरुण

By admin | Published: May 28, 2017 6:26 PM

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बु-हान वानीचा वारसदार सबजार अहमद भट्ट जवानांच्या चकमकीत ठार झाला.

ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. 28 - हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बु-हान वानीचा वारसदार सबजार अहमद भट्ट जवानांच्या चकमकीत ठार झाला. त्यामुळे काश्मीर खो-यात काहीशी अशांतता पसरली आहे. अशा वातावरणातही लष्कराकडून ज्युनिअर कमिशन अधिकारी आणि अन्य पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला काश्मीरमधील जवळपास 800 तरुण बसले आहेत. सबजार अहमद भट्ट या दहशतवाद्याच्या खात्मा केल्यानंतर फुटीरतावाद्यांनी रविवार आणि सोमवारी बंदची हाक दिली होती. मात्र फुटीरतावादी नेत्यांचं आवाहन झिडकारत तरुणांनी या परीक्षेला बसणं पसंत केलं आहे. तसेच फुटीरतावादी नेत्यांच्या विचाराशी सहमत नसल्याचंही काश्मिरी तरुणांनी दाखवून दिलं आहे. लष्करी अधिका-यांच्या मते, फुटीरतावादी नेत्यांच्या बंदच्या हाकेनंतरही पट्टन आणि श्रीनगरमधून रविवारी जवळपास 799 तरुण बसले. 815 उमेदवारांपैकी शारीरिक आणि चिकित्सा परीक्षा उत्तीर्ण होणा-या 16 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली नाही. तरुणांनी उज्ज्वल भविष्यासाठी फुटीरतावादी नेत्यांचे विचार नाकारले आहेत. हिजबूल मुजाहिदीनचा टॉपचा कमांडर सबजार अहमद भट्ट या दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर काश्मीरमध्ये कर्फ्यूसुद्धा लावण्यात आला आहे. मात्र त्यानंतही श्रीनगरमधल्या नौहट्टा, रेनवाडी, खानयार, एम. आर. गंज, सफा कदल, क्रालखड आणि मैसुमामध्ये कर्फ्यू लावण्यात आलं आहे. तरीही मोठ्या प्रमाणात तरुण परीक्ष देण्यासाठी दाखल झाले. उत्तर काश्मीरमधल्या गांदरबल, बडगाम, बांदीपोरा आणि कुपवाडामध्ये कलम 144 लावण्यात आलं आहे. तर दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग, कुलगाम, पुलवामा आणि शोपियनमध्येही सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी रात्री सबजार अहमद भट्टला त्रालच्या त्याच्या गावात दफन करण्यात आलं आहे. त्यात मोठ्या संख्येनं लोकांनी सहभाग घेतला होता. (हिजबुल कमांडरसह १० दहशतवादी ठार)

तत्पूर्वी काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १0 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वनीचा वारसदार सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला आहे. बुरहाननंतर सबजार भट्ट दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता. त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत सबजार आणि त्याचा साथीदार मारला गेला. सबजार भट्ट मारला गेल्याचे वृत्त पसरताच, काश्मीरच्या अनेक भागांत तणाव निर्माण झाला आहे. किमान ५0 ठिकाणी दगडफेक सुरू झाली. हिंसाचारामुळे बऱ्याच भागांमध्ये बंदसदृष्य वातावरण असून, कुलगाम, पुलवामा आणि शोपियन या भागांत सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत.कोण आहे सबजार?गेल्या वर्षी ८ जुलै रोजी लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत बुरहान वनी ठार झाल्यानंतर सबजार अहमदने त्याची जागा घेतली. सब डॉन म्हणून तो काश्मीर खोऱ्यात ओळखला जायचा. वनीच्या मृत्युनंतर मेहमूद गझनवीला कमांडर केल्याचे हिजबुलने जाहीर केले होते, पण गझनवीविषयी कोणालाच माहिती नसून, सबजारचेच ‘गझनवी’ हे टोपण नाव असावे, असा अंदाज आहे. सबजारवर १० लाखांचे इनाम होते.

सबजार हा वनीचा विश्वासू साथीदार होता. वनीबरोबर त्याने दोन वर्षे काम केले होते. हिजबुलच्या संपूर्ण नेटवर्कची त्याला माहिती होती. सबजारचे एका मुलीवर प्रेम होते. तिच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर सबजार दहशतवादी कृत्यांकडे वळला.