पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसकडून 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:36 PM2018-09-06T21:36:33+5:302018-09-06T21:36:46+5:30

काँग्रेसनं पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. तेलाच्या दिवसेंदिवस वाढत्या दरानं सामान्य अक्षरशः हैराण झाली आहे.

On September 10, the Congress called for a shutdown of the against rising prices of petrol and diesel | पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसकडून 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसकडून 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक

नवी दिल्ली- काँग्रेसनं पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. तेलाच्या दिवसेंदिवस वाढत्या दरानं सामान्य अक्षरशः हैराण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेसच्या भारत बंदला विरोधी पक्ष, सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसनं 10 सप्टेंबरला पुकारलेला भारत बंद सकाळी 9 वाजता सुरू होणार असून, तो दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. जेणेकरून सामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही. काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत म्हणाले, आज देशातला कोणताही वर्ग खूश नाही. महागाईनं सर्वांचंच कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या भावानं जनता हैराण आहे. त्यामुळे हिंसेचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वच जण त्रासलेले आहेत. त्यामुळेच आम्ही भारत बंदची हाक दिली आहे. आज सकाळी झालेल्या बैठकीत 10 सप्टेंबरला भारत बंदचा निर्णय झाला आहे.

10 सप्टेंबरला पुकारलेला भारत बंद हा सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच सामान्य जनतेला त्रास होऊ नये, यासाठी तो दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या बंदमध्ये इतर विरोध पक्षही सहभागी होणार आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी गेल्या साडेचार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून 11 लाख कोटी रुपये लुटले आहेत. भारत बंदच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून त्याला जीएसटी अंतर्गत आणण्यासाठी सरकारवर दबाव टाकणार असल्याचंही सुरजेवाला म्हणाले आहेत. 

Web Title: On September 10, the Congress called for a shutdown of the against rising prices of petrol and diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.