नवी दिल्ली : अनेक वर्षे दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या सुनील रस्तोगी (३८) याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, त्याचे अनेक गुन्हे या निमित्ताने समोर आले आहेत. एका अल्पवयीन मुलीला त्याने छतावरून फेकण्याची धमकीही दिली होती. प्रामुख्याने अल्पवयीन शाळकरी मुलींना लक्ष्य करणारा हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, तो १९९० मध्ये तो आपल्या कुटुंबासोबत दिल्लीत आला होता. येथील १३ वर्षीय मुलीला पळवून नेऊन त्याने छतावर तिच्यावर अत्याचार केले. तर तिला छतावरुन फेकून देण्याची धमकीही दिली. आपल्यावर या आरोपीने हल्ला केला होता, अशी माहितीही आता तीन महिलांनी दिली आहे. २००६ मध्ये या अल्पवयीन असताना, त्याने आपल्यावर हल्ला केला होता, पण भीतिपोटी त्याची तक्रार केली नाही, असे या महिलांनी सांगितले. सुनीलने दोन अल्पवयीन मुलींवर १२ जानेवारी रोजी हल्ला केला होता. या मुलींनी सांगितले की, एका अंधाऱ्या खोलीत त्याने आम्हाला नेले, पण तेथून पळ काढला व जवळच्या एका व्यक्तीला मदत मागितली, पण तोही धोकेबाज निघाला. क्रूर हास्य करत त्यांनी आम्हाला धमकाविले. रस्तोगी अशोकनगरमधील जुनी घरे किंवा बांधकाम सुरू असलेल्या इमारती तो हेरून ठेवायचा. तिथे वर्दळ नसायची. उत्तराखंडातील रुद्रपूर येथे २००६ मध्ये लैंगिक छळाच्या एका प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याला जामीन मिळाला. २०१६ मध्ये रुद्रपूरमधूनच अन्य एक तक्रार आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क) >२००४ मध्ये सुनीलने दिल्लीत एका मुलीची छेड काढली होती, पण त्या वेळी तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आले नाही. लैंगिक अत्याचारापासून लहान मुलांचे संरक्षण (पीओसीएसओ) कायद्यानुसार २०१६ मध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.पण सहा महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला. पुढच्या सुनावणीच्या वेळी तो न्यायालयात हजर झालाच नाही आणि पळून गेला, पण १३ डिसेंबर रोजी अशोकनगरमधील प्रकरणानंतर त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला.१२ जानेवारी रोजी दोन अल्पवयीन मुलींनी सुनीलविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली. कायद्यानुसार २०१६ मध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.
सीरियल रेपिस्ट अखेर कोठडीत
By admin | Published: January 18, 2017 5:19 AM