Rajasthan Political Crisis: वसुंधराराजेंवर गंभीर आरोप; एनडीएच्या खासदाराने सांगितले गेहलोत सरकार कसे वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 08:57 PM2020-07-16T20:57:42+5:302020-07-16T21:09:52+5:30

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनीदेखील राजे आणि गेहलोत यांच्या राजकीय मैत्रीवर वक्तव्य केले आहे. यामुळे हे आरोप राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देऊ शकतात. अमित शहा यांनाही यात घेतल्याने याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. 

Serious allegations against Vasundhara Raje; NDA MP told how the Gehlot government survived | Rajasthan Political Crisis: वसुंधराराजेंवर गंभीर आरोप; एनडीएच्या खासदाराने सांगितले गेहलोत सरकार कसे वाचले

Rajasthan Political Crisis: वसुंधराराजेंवर गंभीर आरोप; एनडीएच्या खासदाराने सांगितले गेहलोत सरकार कसे वाचले

जय़पूर : राजस्थानमधील राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. एकीकडे सचिन पायलट यांनी केलेले बंड फसल्याचे दिसू लागले असताना पायलट यांना भाजपाकडून छुपा पाठिंबा असुनही भाजपाच्याच माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानच्या नेत्या वसुंधराराजे या शांत आहेत. यामुळे शंकांना वाव मिळत असताना एनडीएच्याच सहयोगी पक्षाच्या खासदाराने वसुंधराराजेंवर गंभीर आरोप केले आहेत. 


नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी हे आरोप केले आहेत. बेनिवास यांनी सांगितले की, वसुंधराराजेंमुळेच गेहलोत सरकारची बुडणारी नौका पुन्हा तरंगू लागली आहे. बेनिवाल यांनी या आधीही वसुंधरा राजेंवर कोमतीही भीडभाड न ठेवता आरोप केले आहेत. बेनिवाल यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक ट्विट करत भाजपाच्या दिग्गज नेत्या राजस्थानमधील काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी आमदारांना फोन करत असल्याचा आरोप केला आहे. वसुंधरा यांचा प्रभाव एवढा आहे की, त्यांच्या सूचनेवरून पायलट यांच्या बंडखोरीच्या बाजुने असलेले आमदार पुन्हा माघारी जात आहेत. 


बेनिवाल यांनी #गहलोत_वसुंधरा_गठजोड़ असा हॅशटॅग करत हे आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या अशोक गेहलोत यांचे अल्पमतात आलेले सरकार वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. राजे यांनी काँग्रेसच्या अनेक आमदारांना स्वत: फोन करून माघारी फिरण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे बेनिवाल यांनी या ट्विटमध्ये गृह मंत्री अमित शहा, त्यांचे ऑफिस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राजस्थान भाजपा यांना टॅग केले आहे. 


बेनिवाल एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी वसुंधरा राजेंनी फोन केलेल्या दोन आमदारांचेही नाव घेतले आहे. वसुंधरा राजे राजस्थान काँग्रेसमधील जवळच्या आमदारांना फोन करून गेहलोत  यांना पाठिंबा देण्यास सांगितले. यामध्ये सीकर आणि नागौर जिल्ह्यातील दोन जाट आमदारांना त्यांनी पायलट यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले. याचे पुरावे आपल्याकडे आहेत. जनता वसुंधरा राजे आणि गेहलोत यांची युती पुरती समजली असल्याचा आरोप त्यांनी केला.


महत्वाचे म्हणजे आता सचिन पायलट यांनीदेखील राजे आणि गेहलोत यांच्या राजकीय मैत्रीवर वक्तव्य केले आहे. यामुळे हे आरोप राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देऊ शकतात. अमित शहा यांनाही यात घेतल्याने याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार

अमित शहा, हात जोडते! सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय तपास करा; प्रेयसी रिया चक्रवर्तीची मागणी

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल

Web Title: Serious allegations against Vasundhara Raje; NDA MP told how the Gehlot government survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.