कॉम्प्युटरमुळे घराघरात पोहोचलेल्या मायक्रोसॉफ्टने भारतातील लोकसभा निवडणुकीवरून गंभीर इशारा दिला आहे. निवडणुकीच चीन हेरा-फेरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे व तैवानमध्ये याची ट्रायलही झाल्याचे सांगत सावध केले आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे बनविलेला कंटेंटचा वापर करून चीन अमेरिका, दक्षिण कोरिया आणि भारतात होत असलेल्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी थ्रेट इंटेलिजन्स रिपोर्ट जाहीर केला. यामध्ये उत्तर कोरियासोबत मिळून चीन हे कृत्य करत असल्याचे म्हटले आहे. चीनचे समर्थन असलेले काही सायबर ग्रुपचा यामध्ये हात असून निवडणुका प्रभावित करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि एआय जनरेटेड कंटेंटचा वापर केला जाणार असल्याचे यात म्हटले आहे.
अशा प्रकारे सोशल मीडियामध्ये कंटेंट पसरवून चीनचा हा प्रयोग येत्या काळात अत्यंत घातक ठरू शकतो, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. जानेवारीमध्ये झालेल्या तैवानच्या राष्ट्रपती निवडणुकीत देखील चीनने हा प्रयोग केला होता. हे अशा प्रकारचे पहिलेच उदाहरण आहे. चीनचा एक सायबर ग्रुप जो स्टॉर्म 1376 या नावाने ओळखला जातो त्याने तैवानच्या निवडणुकीत धुमाकूळ घातला होता. त्याला बिजिंगचा पाठिंबा होता. काही उमेदवारांना बदनाम करण्यासाठी एआय कंटेंट मोठ्या प्रमाणावर टाकला जात होता.
देशात सध्या लोकसभा निवडणुका आहेत. या सात टप्प्यांमध्ये होणार आहेत. यामध्ये चीन सर्व पक्षांच्या चांगल्या उमेदवारांविरोधात सायबर मोहिम उघडण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टच्या इशाऱ्यानंतर निवडणूक आयोगाला आता जास्त सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.