सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्यानं देशात अडीच लाखांच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारांनीही कठोर निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही उत्पादनाच्या ५० टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर निश्चित केले आहेत.भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड लसीचे दर निश्चित केले आहेत. राज्य सरकारांना सीरम ही लस ४०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं तर खासगी रुग्णालयांना सीरम ही लस ६०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं देणार आहे. सीरम इन्स्टीट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार एकूण लसीच्या उत्पादनाचा ५० टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी दिला जाणार आहे. तसंच उर्वरित हिस्सा हा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिला जाईल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली. 'पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लसींचं उत्पादन वाढवणार असून लसींची कमतरता भरून काढणार आहोत,' अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आली.
Serum नं निश्चित केली Covishield लसीची किंमत; पाहा किती असेल राज्य सरकार, खासगी रुग्णालयांसाठी दर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 1:10 PM
Coronavirus Vaccine Price : सीरम इन्स्टिट्यूटनं दिली लसीच्या किंमतीची माहिती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस
ठळक मुद्देसीरम इन्स्टिट्यूटनं दिली लसीच्या किंमतीची माहिती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस