शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

Coronavirus Vaccine : लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटींची गरज : अदर पूनावाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 8:28 AM

सरकारच्या सांगण्यावरून १५०-१६० रूपयांना लसींचा पुरवठा, पण उत्पादनाची किंमत जवळपास १५०० रूपये, पूनावाला यांची माहिती

ठळक मुद्देसरकारच्या सांगण्यावरून १५०-१६० रूपयांना लसींचा पुरवठा : अदर पूनावालाउत्पादनाची किंमत जवळपास १५०० रूपये, पूनावाला यांची माहिती

देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली असून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यास अनेकांकडून विचारणा केली जात आहे. अशा परिस्थिती मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. दरम्यान Covishield लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आपल्या लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटी रूपयांची गरज आहे. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute Of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. यापूर्वी अदर पूनावाला यांनी परवडणाऱ्या दरात सुरूवातील १०० दशलक्ष डोस देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. "कंपनीला आताच्या तुलनेत मोठा नफा कमवायला हवा होता. जेणेकरून ती रक्कम उत्पादन आणि सुविधांसाठी पुन्हा गुंतवता आली असती. तसंच अधिक डोसही उपलब्ध करता आले असते," असं अदर पूनावाला म्हणाले. त्यांनी एनडीटीव्ही साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. "आम्ही भारतीय बाजारात लस जवळपास १५० ते १६० रूपयांमध्ये सप्लाय करत आहोत. जेव्हा ही लस तयार करण्याचा खर्च हा जवळपास २० डॉलर्स (अंदाजे १५०० रूपये) आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या म्हणण्यावरून कमी दरात ही लस उपलब्ध करून देत आहोत. असं नाहीये की आम्ही नफा कमवत नाही. परंतु आम्हाला अधिक नफा होत नाही जो पुन्हा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे," असं पूनावाला म्हणाले. ... तर लस ९० टक्के प्रभावीकोरोना महासाथीचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर भारतातील काही राज्यांतील स्थिती चिंताजनक होत असताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती देऊन मोठा दिलासा दिला आहे. दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने लस दिल्यास कोविशिल्ड ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे चाचणीअंती आढळून आलं आहे, असं त्यांनी यापूर्वी सांगितलं. कोविशिल्ड लसीच्या प्रभाव क्षमतेबाबत दोन समूहांवर करण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षात एका महिन्याच्या अंतराने एका समूहाला ही लस देण्यात आली असता ही लस ६० ते ७० टक्के प्रभावी असल्याचं आढळले. दुसऱ्या समूहाला दोन ते तीन महिन्यांच्या अंतरानं देण्यात आली असता लस ९० टक्के प्रभावी आढळली.मागच्या महिन्यात लसीकरणावरील तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसार सरकारनं लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं आहे. इतर देशांत पहिल्या डोसनंतर सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिल्यास लसीची क्षमता वाढल्याचे चाचणीअंती आढळल्यानं या समितीने दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केली होती. "लसीच्या पहिल्या डोसनंतर प्रतिकार क्षमता वाढणे सुरू होते. पहिला डोस घेतलेल्या पन्नास वर्षांखाली लोकांतही लसीचा उत्तम प्रतिसाद आढळून आला. कोविड-१९ च्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत मिळणारे संरक्षणही चांगलं आहे. एका डोसनंतर ७० टक्के लोकांनाही या संसर्गापासून पूर्णत: सुरक्षित आहेत," असं पूनावाला यांनी सांगितलं. 

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस