Coronavirus Vaccine Adar Poonawalla: इंडिया ग्लोबल फोरम २०२१ मध्ये भाग घेत सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लसींच्या कमतरतेवर आपलं मत व्यक्त केलं. लसींच्या आयात निर्यातीमुळे लसींची कमतरता भासणं ही सामान्य बाब आहे. अशी स्थिती यापूर्वीही होती कारण जे देश लस खरेदी करण्यासाठी सक्षम आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल, असं पूनावाला म्हणाले. "गोष्टी इतक्या चुकीच्या झाल्यात असं मला वाटत नाही. जागतिक गरज पूरअण करण्यासाठी आपल्यासा अब्जावधी लसींची गरज आहे. जगातील सर्व लस उत्पादक कंपन्या सहकार्य करत आहे आणि कोणताही मार्ग नाही. आपण पुढे जात आहोत आणि अन्य देखील," असं ते म्हणाले.
"जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान लसींच्या ६ कोटी डोसेसची निर्यात करण्यात आली. जी कोणत्याही अन्य देशापेक्षा अधिक होती. परंतु आनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजला होता. त्यानंतर आम्ही आमचं लक्ष भारतावर केंद्रीत केलं, कारण त्यावेळी याची अधिक गरज होती," असंही पूनावाला म्हणाले.
ईएमएकडे अर्ज केलायूके एमएचआरए, डब्ल्यूएचओ यांच्या मंजुरी प्रक्रियेस देखील वेळ लागला आणि आम्ही ईएमएकडे अर्ज केला. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की एका महिन्यात ईएमए कोविशिल्ड लसीला मंजुरी देईल. असं न करण्याचं कोणतंच कारण नाहीये, कारण ते अॅस्ट्राझेनकाच्या डेटावर आधारित आहे आणि आमचं उत्पादनही अॅस्ट्राझेनकाच्या समानच आहे. याला WHO, ब्रिटन एमएचआरएद्वारे मंजुरी देण्यात आली असल्याचंही त्यांनी म्हटलं.