पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनेकासह कोरोना लसची निर्मिती करत आहे. या कोरोना लसीकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.साधारण डिसेंबर ते मार्च या दरम्यान ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र सिरम इन्स्टिटयूट कडून पुन्हा एकदा कोरोना लसीविषयीची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
'सिरम' चे सीईओ आदर पूनावाला यांनी २०२१ मध्ये पाच वेगवेगळ्या कोरोना लसींचे १०० कोटी डोसची निर्मिती करणार असल्याची माहिती दिली आहे. कोव्हिशिल्ड , कोवोवॅक्स, कोविववॅक्स कोवीवॅक, एसआआय कोवॅक्स असे या लसींचे नावे आहेत साधारण २०२२ च्या पूर्वीच हे डोस तयार करण्याचा प्रयत्न आहे अशी ही माहिती पूनावाला यांनी 'इंडिया टुडे' ला दिली आहे. कोव्हिशिल्ड , कोवोवॅक्स, कोविववॅक्स कोवीवॅक, एसआआय कोवॅक्स असे या लशींचे नावे आहेत.
पूनावाला म्हणाले, सिरम इन्स्टिट्यूट “कोव्हिशिल्ड या लसीपासून सुरुवात करणार असून पुढील वर्षी अर्थात २०२१ मध्ये दर तीन महिन्याला एक लस उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कोव्हिशिल्ड या युकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या लसीची वैद्यकीय चाचणीचा तिसरा टप्पा सध्या भारतात सुरु आहे. १६०० स्वयंसेवक अंदाजे या चाचणीत सहभागी झाले आहेत.
बायोटेक कंपनी 'कोवोवॅक्स' च्या साथीने ही लस तयार केली जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून “कोव्हिशिल्ड नंतर कोवोवॅक्स या लसीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात मे २०२० मध्ये कोवोवॅक्स लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करण्यात आली असून यावर्षीच्या शेवटपर्यंत अंदाजे ३० हजार स्वयंसेवकांसह चाचणीचा तिसरा टप्पा सुरु होण्याची अंदाज वर्तविला जात आहे. सिरमला सोबत घेऊन पुढील वर्षी १०० कोटी डोस तयार करण्याची नोवोवॅक्सची योजना आहे.