नवी दिल्ली, दि. 17 - पोलीस कर्मचा-यांना कदाचीत हे वृत्त पचणार नाही पण यापुढे पोट सुटलेल्या किंवा अनफिट पोलिसांचा विशेष पदकाने किंवा पुरस्काराने गौरव केला जाणार नाही. राष्ट्रपती पोलीस पदकासारख्या पुरस्कारांसाठी पोट सुटलेल्या किंवा अनफिट पोलिसांचा विचार केला जाणार नाही असं गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
कायदा लागू करण्याची जबाबदारी असणा-यांना जर विशेष पुरस्कारासाठी आपल्या नावाचा विचार व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी शारीरिक दृष्ट्या फिट असणं गरजेचं आहे असं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय भ्रष्टाचाराचे आरोप असलेले म्हणजेच ज्यांची प्रतिमा डागाळलेली असेल अशा पोलिसांनाही पदक दिलं जाणार नाही. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.'शेप 1’ श्रेणी-सर्व राज्य सरकारी आणि केंद्रीय पोलीस संघटनांसाठी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात मंत्रालयाने राष्ट्रपती पोलीस पदाकासाठी शेप-1 श्रेणीमध्ये असावं असं म्हटलं आहे.
(फोटो सौजन्य-इनाडू)