मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर २०० रुपयांचा उच्चांक गाठणाऱ्या डाळींच्या दराने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारची कोंडी झाली असून, जनतेतील असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी अखेर डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबियांच्या साठ्यावर ११ महिन्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढत्या दरामुळे गरिबाघरी डाळ शिजेना म्हणून, केंद्र सरकारने या वस्तूंचा साठा करण्याकरिता लागू केलेल्या निर्बंधांना अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील आदेश जारी केले. राज्यात डाळी, खाद्यतेले आणि तेलबियांची साठेबाजी करण्यावरील निर्बंध ३० सप्टेंबर २०१६पर्यंत लागू असणार आहेत. यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये डाळी आणि खाद्यतेलांच्या साठवणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. आजच्या आदेशानुसार डाळी, खाद्यतेलबिया आणि खाद्यतेल यांच्या साठवणुकीवर सरकारने फेब्रुवारी २०१०मध्ये लागू केले तसे निर्बंध लागू राहतील.या उपाययोजनेनंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्यातील परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार असून, याबाबत दररोज सायंकाळी विभागाकडून आढावा घेण्यात येणार आहे, असे या विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितले आहे. दरम्यान, केंद्र शासनाने डाळींचा काळाबाजार व साठेबाजीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महाराष्ट्रात मागील दोन महिन्यांमध्ये सामान्य नागरिक, बाजार समित्यांचे प्रतिनिधी व विरोधी पक्षही साठेबाजी थांबविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. एक वर्षापासून डाळी बाजार समितीमधून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे साठेबाजांवर बाजार समिती कारवाई करीत नाही. शासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना बाजारभाव २०० रुपयांपेक्षा जास्त झाल्यानंतरही अद्याप एकाही साठेबाजावर कारवाई केलेली नाही. (विशेष प्रतिनिधी)२५ लाखांची डाळ चोरीलानागपूरमध्ये २५ लाख रुपये किमतीची तुरीची डाळ चोरीला गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कळमना पोलिसांनी रविवारी या प्रकरणी ट्रकचालक व अन्य काही जणांना ताब्यात घेतले. साठवणुकीच्या मर्यादा अशाघाऊक आणि किरकोळ डाळ विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा महानगरपालिका, अ वर्ग पालिका क्षेत्र इतर ठिकाणी अनुक्र मे ३५०० व २०० क्विंटल, २५०० व १५० क्विंटल आणि १५०० व १५० क्विंटल याप्रमाणे असेल.खाद्यतेलबियांसाठी (टरफले असलेल्या शेंगदाण्यासह) साठा मर्यादा घाऊक आणि किरकोळ विक्रे त्यांसाठी महापालिका क्षेत्र आणि इतर ठिकाणी अनुक्र मे २००० व २०० क्विंटल आणि ८०० व १०० क्विंटल अशी असेल. (शेंगदाणे अथवा बियांसाठी याप्रमाणाच्या ७५ टक्के साठा मर्यादा लागू राहील.)सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या बाबतीत महापालिका क्षेत्रातील घाऊक विक्रे ते १००० क्विंटल, तर किरकोळ विक्रे ते ४० क्विंटल खाद्यतेल साठवू शकतील. इतर ठिकाणी मात्र या मर्यादा घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसाठी अनुक्र मे ३०० व २० क्विंटल याप्रमाणे असतील.डाळींच्या किमती एक वर्षात दुप्पटदसरा, दिवाळी जवळ आली असताना डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. एक वर्षात तूरडाळ तिप्पट व इतर डाळींचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. गेल्या एक वर्षामध्ये भाववाढीने विक्रम केला आहे.
डाळ शिजेना!
By admin | Published: October 20, 2015 4:35 AM