महिला समितीचा मनपामागे ससेमिरा २ सप्टेंबला बैठक: अधिकार्यांची धावपळ
By admin | Published: August 25, 2015 12:39 AM
जळगाव : शासन स्तरीय महिला बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या समितीची बैठक येत्या २ सप्टेंबर रोजी मंत्रालयात असून बैठकीच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यात अधिकार्यांची तारांबळ उडाली आहे.
जळगाव : शासन स्तरीय महिला बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या समितीची बैठक येत्या २ सप्टेंबर रोजी मंत्रालयात असून बैठकीच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यात अधिकार्यांची तारांबळ उडाली आहे. गेल्या वर्षी महापालिका क्षेत्रांतर्गत महिलांच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी शासनाची महिला आमदारांचा सहभाग असलेली ही समिती जळगावी आली होती. विविध पातळ्यांवर या समितीने बैठका घेऊन काही भागात भेटी दिल्या होत्या. महिला कर्मचार्यांच्या समस्यांचीही माहिती घेतली होती. त्यानंतर आता समितीने महापालिकेकडून गेल्या वर्षी दिलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. येत्या २ सप्टेंबरला ही बैठक मंत्रालयात होणार आहे. सोमवारी या संदर्भातील माहिती मागविण्यात आली होती. त्यामुळे रविवारी सुीच्या दिवशीही अधिकारी वर्ग महापालिकेत रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होता. सोमवारी रात्री ही माहिती रवाना केली जाणार असून सर्व माहिती गोपनीय असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.