नवी दिल्ली : देशातील सात कोटी महिला मेहनतीची कामे करताना लागणारी भूक मारण्यासाठी तंबाखूचे सेवन करत असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटना, पब्लिक हेल्थ फाउंडेशन आॅफ इंडिया यांच्यासह काही संस्थाना सोबत घेऊन तयार केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली. देशात दरवर्षी तोंडाचा किंवा घशाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी ८५ हजार पुरुष आणि ३४ हजार महिला कर्करुग्ण असल्याचे निदान होते. त्यातील ९० टक्के रुग्णांनी तंबाखूचे सेवन केलेले असते, अशी माहितीही अहवालातून पुढे आली.
भूक मारण्यासाठी सात कोटी महिला खातात तंबाखू
By admin | Published: November 12, 2016 2:40 AM