शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बिहार रणसंग्रामात सात माजी मुख्यमंत्र्यांचे योद्धे

By admin | Published: September 25, 2015 11:53 PM

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यंदा सात माजी मुख्यमंत्र्यांचे योद्धे आपली शक्ती अजमावणार आहेत.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यंदा सात माजी मुख्यमंत्र्यांचे योद्धे आपली शक्ती अजमावणार आहेत. या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये हिंदुस्तान अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी, जनविकास मोर्चाचे अध्यक्ष जगन्नाथ मिश्र, जनता दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष सतीशप्रसाद सिंग, समाजवाटी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांचा समावेश आहे. यापैकी मांझी आणि सिंग हे बिहारसाठी परिचित असले तरी त्यांनी प्रथमच आपल्या पक्षाला निवडणूक आखाड्यात उतरविले असून त्यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा असणार आहे. लोकांच्या नजरा त्यांच्यावर आहेत. स्वत: मांझी दोन विधानसभा मतदारसंघातून भविष्य अजमावीत आहेत. रालोआचा मुख्य घटक भाजपकडून माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांचे पुत्र व माजी मंत्री नितीश मिश्रा, आणि याच आघाडीतील हमचे माजी मुख्यमंत्री मांझी यांचे पुत्र संतोष मांझी रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री मिश्र हे मात्र निवडणूक लढविणार नाहीत. संयुक्त जनता दलाच्या नेतृत्वातील महाआघाडीकडून माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुले तेजप्रताप आणि तेजस्वी प्रथमच निवडणूक राजकारणात उतरली आहेत. राबडीदेवी या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली असल्याने खुद्द लालूप्रसाद निवडणूक लढविणार नसले तरी त्यांच्या पक्षाचे अनेक उमेदवार आपले भविष्य अजमावीत आहेत. माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव स्वत: निवडणूक लढवीत नसले तरी रालोआ आणि महाआघाडीविरुद्ध सहा पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करून सर्व २४३ जागांवर उमेदवार उभे करून त्यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. त्याचप्रमाणे मायावतींची बसपा स्वबळावर दंगलीत उतरली असून आपल्या पहेलवानांवर त्यांना पूर्ण विश्वास आहे. मतदार कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांच्या योद्ध्यांना पसंती देतात हे येणारा काळच सांगेल. (वृत्तसंस्था)