नवी दिल्ली : ‘आयएनएस सिंधुर}’ या पाणबुडीला या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या अपघाताच्या चौकशीत नौदलाचे सात अधिकारी दोषी आढळले आहेत. या पाणबुडीला लागलेल्या आगीत दोन अधिका:यांचा मृत्यू झाला होता व माजी नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांना राजीनामा द्यावा लागला होता. दोषी नौदल अधिका:यांविरुद्ध वेस्टर्न नेव्हल कमांड मुख्यालयात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.
या पाणबुडी जळितप्रकरणी बोर्ड ऑफ इन्क्वायरीच्या अहवालात विविध कृत्यांबाबत सात नौदल अधिकारी दोषी आढळले आहेत, असे र्पीकर यांनी सांगितले. मुंबईजवळच्या समुद्रात नियमित प्रशिक्षण व निरीक्षण कामावर असलेल्या ‘आयएनएस सिंधुर}’ मध्ये गेल्या 26 फेब्रुवारी रोजी आग लागली होती. आगीच्या घटनेच्या दिवशीच जोशी यांनी अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला होता. त्याआधी 14 ऑगस्ट 2क्13 रोजी ‘आयएनएस सिंधुरक्षक’ या दुस:या एका पाणबुडीला अपघात झाला होता आणि त्यात 18 अधिका:यांना प्राण गमवावा लागला होता. अपघातानंतर या पाणबुडीला जलसमाधी मिळाली होती. या अपघातासाठी नेमलेल्या बोर्ड ऑफ इन्क्वायरीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही, असे र्पीकर यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)