वेतन आयोगाचा सात लाख फरक अधिकार्यांनी उचलला वेतन कपातीची शिफारस : भोर,खरात यांचाही समावेश
By admin | Published: March 20, 2016 2:13 AM
जळगाव : आर्थिक व्यवहार हाती असल्याने कर्मचार्यांच्या पगारातून ७५ टक्के कपातीची शिफारश करणार्या अधिकार्यांनी मात्र सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ७ कोटी ३५ लाखांची उचल केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.
जळगाव : आर्थिक व्यवहार हाती असल्याने कर्मचार्यांच्या पगारातून ७५ टक्के कपातीची शिफारश करणार्या अधिकार्यांनी मात्र सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ७ कोटी ३५ लाखांची उचल केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मनपा कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक देणे टाळण्यासाठी मनपातील अधिकार्यांनी कर्मचार्यांच्या वेतनात ७५ टक्के कपात करण्याची शिफारस केली आहे. याचे पडसाद मनपाच्या स्थायी समिती सभेत उमटले. कर्मचार्यांनीही याप्रश्नी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला. या प्रकाराची स्थायी सभेत सदस्यांनी गंभीर दखल घेऊन अधिकार्यांना धारेवर धरले असता तशी माहिती वृत्तपत्रांना दिली नसल्याचे सांगून व प्रस्ताव नसल्याचे सांगत सभागृहाचीदेखील दिशाभूल केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराची गंभीर पडसाद सभागृह तसेच मनपा कर्मचारी वर्गाकडून उमटत असताना उपमहापौर ललित कोल्हे यांनी याप्रश्नी नाराजी व्यक्त करत कर्मचार्यांचे पगार कपातीचे शिफारस करणार्या या अधिकार्यांनी कशी उचल केली याचे बिंग फोडले आहे. यांनी केली उचलकपातीची शिफारस करणारे मुख्य लेखापरीक्षक सुभाष भोर यांनी मनपातून सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ३८ हजार ९२४ रूपयांची उचल केली आहे. तसेच मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत खरात यांनी ३३ हजार ३ रुपये उचल केली आहे. २०१३ पासून विविध पदावरील अधिकार्यांनी उचल केलेल्या रकमा पुढील प्रमाणे आहेत. आयुक्त प्रकाश बोखड - ३७, ३३९, उपायुक्त आर.आर. काळे - १, ७८, ७०५, सहा. संचालक नगररचनाकार एन.एस. आढारी- १, ०४, ३९१, उपायुक्त भालचंद्र बेहेरे- ७४, ७५०, मुख्य लेखापरीक्षक प्रवीण पंडित- ३३,२६०, मुख्य लेखापरीक्षक वाय.जे. ठाकूर- ३८,९२४, मुख्य लेखाधिकारी सुरेश सोळसे - ३३, ३७६, सहा. आयुक्त अविनाश गांगोडे- ४२, १२७, शहर अभियंता गजमल ठाकरे- ७७, २६८, शहर अभियंता सी.जी. पाटील - ४३, ९२६ या प्रमाणे रकमा उचलण्यात आल्या आहेत.प्रकार आयोग्यकर्मचार्यांच्या पगारातून कपात करण्यांची भाषा करून स्वत: मात्र मनपाच्या अडचणींचा विचार न करता पैसा उचलून घेण्याचा हा प्रकार योग्य नसून कपातीची भाषा यापुढे करू नये अशी भूमिका ललित कोल्हे व बंटी जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.