लोकसभेतील काँग्रेसचे सात सदस्य निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 03:40 AM2020-03-06T03:40:44+5:302020-03-06T03:40:55+5:30

दिल्लीतील हिंसाचारावरून होत असलेल्या गोंधळात पीठासीन अधिकारी मीनाक्षी लेखी आणि सरकार यांच्यातील हातमिळवणीतून काँग्रेसचे सात खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या राहिलेल्या कालावधीसाठी गुरुवारी निलंबित केले गेले.

 Seven members of Congress suspended in Lok Sabha | लोकसभेतील काँग्रेसचे सात सदस्य निलंबित

लोकसभेतील काँग्रेसचे सात सदस्य निलंबित

Next

शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : लोकसभेत दिल्लीतील हिंसाचारावरून होत असलेल्या गोंधळात पीठासीन अधिकारी मीनाक्षी लेखी आणि सरकार यांच्यातील हातमिळवणीतून काँग्रेसचे सात खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या राहिलेल्या कालावधीसाठी गुरुवारी निलंबित केले गेले.
गोंधळामुळे संसदेचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. तरीही पीठासीन अधिकारी विधेयके प्रस्तावीत करणे आणि दस्तावेज सदनाच्या पटलावर ठेवण्याचे काम करीत राहिले. हिंसाचारावर चर्चेची मागणी करून विरोधी पक्षाचे जे खासदार सभागृहात गोंधळ घालत होते ते सरकारच्या आग्रहावरून आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन कोरोना व्हायरसबाबत निवेदन करीत असताना शांत बसलेले होते.
तीन दिवसांपासून जवळपास सगळा विरोधी पक्ष दिल्लीतील हिंसाचारावर चर्चेची मागणी करीत आला आहे. कार्यस्थगन प्रस्तावदेखील त्याने दिले. परंतु, अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष करीत एकीकडे कामकाज सुरू ठेवले तर दुसरीकडे चर्चेसाठी होळीनंतरची तारीख दिली.

Web Title:  Seven members of Congress suspended in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.